Pune Kalicharan Maharaj : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे (Pune news) चर्चेत असणारे कालीचरण महाराज  तिथीप्रमाणे (Kalicharan maharaj) होणाऱ्या शिवजन्मोत्सव (Shiv jayanti) सोहळ्यानिमित्त शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे पुण्यात येणार आहे. शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे त्यांची जाहीर हिंदू धर्मजागरण सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या शनिवारी ( 11 मार्च) सायंकाळी 7 वाजता त्यांची सभा आहे. सनसिटी रस्ता, भाजी मंडई शेजारी, सिंहगड रस्ता, पुणे येथे हिंदू समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी ही हिंदु धर्मजागरण सभा होणार आहे.


सभेचं आकर्षण
या सभेचे आकर्षण म्हणजे श्रद्धेय कालीपुत्र कालीचरण महाराज त्यांच्या खड्या आवाजात शिवतांडव स्तोत्र म्हणणार आहेत. या सभेसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंजुषा नागपुरे यावेळी उपस्थित असतील. प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजयंती महोत्सवाचे हे अठरावे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि विचारांचा जागर अधिक जोमाने व्हावा आणि हिंदू समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू बांधवानी संघटीतपणे उभे राहावे, हा या सभेमागील उद्देश आहे.


वादग्रस्त वक्त्याव्यावरुन कायम चर्चेत


वादग्रस्त वक्त्याव्यावरुन कालीचरण महाराज कायम चर्चेत चर्चेत असतात. त्यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनेकांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर नाशिकमध्येदेखील त्यांनी इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कालीचरण महाराज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी 'इस्लाम धर्मच नाही' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता त्यांची पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ते पुण्यात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


कोण आहेत 'कालीचरण महाराज'  
'कालीचरण महाराज' अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचं मुळ नाव 'अभिजीत धनंजय सराग'. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक. घरच्यांना तो शिकावा, काहीतरी वेगळं काम करावं असं वाटायचं. मात्र, या परिस्थितीतही त्यांचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्यांना 'महाराज' संबोधनं सुरू केलं. मात्र, 'कालीचरण महाराज' स्वत: आपण महाराज नव्हे तर 'कालीमाते'चा भक्त आणि पुत्र असल्याचं सांगतात.