सांगली : प्रसिद्ध उद्योगपती आणि भिलवडी येथील मे.बी.जी. चितळे डेअरीचे संचालक प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे उर्फ काकासाहेब चितळे यांचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिरज येथे हृदय विकाराच्या धक्क्याने शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता चितळे, उद्योगपती गिरीश चितळे, मकरंद चितळे दोन मुले आणि मुलगी वीणा सहस्त्रबुद्धे, सूना नातवंडे असा परिवार आहे.
शुक्रवारी (7 फेब्रुवारी) रात्री प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. चितळे उद्योग समूहाचे डायरेक्टर गिरीश चितळे यांचे काकासाहेब चितळे वडील होते.
चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असलेली दुग्धोत्पादक संस्था असून याची स्थापना इ.स. 1939 मध्ये भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली होती. चितळे यांच्या दुसऱ्या पिढीतीले असलेले काकासाहेब यांनी मोठ्या हिंमतीने चितळे उद्योग पुढे चालवत या उद्योगात आधुनिकता आणली.
शैक्षणिक, आरोग्य, नेत्रदान, रक्तदान, औद्योगिक चळवळीत काकासाहेब चितळे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या दुग्ध उद्योग क्षेत्रासह कृष्णाकाठ परिसरावर शोककळा पसरली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया असो , दुध पाश्चरायजेशन असो किंवा विविध दुग्ध उत्पादने तयार करणारी यंत्रणा असो यात चितळे समूहाने देशभर मोठे नाव कमवले आहे. प्रतिदिन 2.4 लाख लिटर दुग्धोत्पादन क्षमतेची ही संस्था पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांतून दूध पुरवठा व विक्री करते.
सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे काकासाहेब चितळे यांचे मुळ गाव आहे. या ठिकाणाहुन चितळे बंधूनी आपल्या उद्योग समूहाची सुरूवात केली आणि आज जगभर त्यांची विविध उत्पादने पोहचली आहेत. दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि बाकरवाडी हे चितळेची प्रसिद्ध उत्पादने आहेत. मॅकेनिकल इंजिनिअर चे शिक्षण घेतल्यानंतर काकासाहेब यांनी वडील बाबासाहेब चितळे व भावंडा सोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहिले.
भिले होते.
प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे यांचे निधन
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
08 Feb 2020 06:11 PM (IST)
मिरज येथे हृदय विकाराच्या धक्क्याने शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता चितळे, उद्योगपती गिरीश चितळे, मकरंद चितळे दोन मुले आणि मुलगी वीणा सहस्त्रबुद्धे, सूना नातवंडे असा परिवार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -