मुंबई: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, वसई विकास सहकारी बँक आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे,
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ECIL)
पोस्ट - पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस हवेत
शैक्षणिक पात्रता - पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 212
वयोमर्यादा - 25 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण - हैदराबाद
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022
तपशील - ecil.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये current job openings वर क्लिक करा. संबंधित भरतीसंदर्भातली लिंक दिसेल. advertisement डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
वसई विकास सहकारी बँक लि.
पोस्ट - मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली
शैक्षणिक पात्रता - CAIIB/DBF/ डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी
एकूण जागा - 9
नोकरीचं ठिकाण - वसई, जि. पालघर
ऑफलाईन आणि ईमेल करुनही तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज पाठवण्या पत्ता - कार्यवाहक महाव्यवस्थापक, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालयसमोर, चिमाजी आप्पा मैदान, वसई डेपो जवळ, वसई (प.) जिल्हा-पालघर 401201
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - hrd@vasai vikas bank.co.in.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022
तपशील - www.vasaivikasbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - सहायक प्राध्यापक / Assistant Professor
शैक्षणिक पात्रता - M.Sc NET किंवा आरक्लेव्हॅनर विषयात पीएच.डी / MA
एकूण जागा - 14
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जानेवारी 2023
तपशील- www.pdkv.ac.in
पोस्ट - शिक्षक (व्याख्याता)
शैक्षणिक पात्रता - M.P.Ed. किंवा M.Sc किंवा Ph.D. NET/ SET
एकूण जागा - 6
नोकरीचं ठिकाण - चंद्रपूर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - सह अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, जिल्हा- चंद्रपूर- 441224
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जानेवारी 2023
तपशील- www.pdkv.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)