Jitendra Awhad State News Live Update : रामाबाबतच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक, राज्यभर आंदोलन सुरु

Jitendra Awhad State News Live Update : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात घाटकोपर आणि पुण्यातील अलका चौकात भाजपने आंदोलन सुरु केला आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 04 Jan 2024 12:22 PM
Jitendra Awhad Live : आमचा राम जात-पात न मानणारा : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Live : मी कोणतेही प्रकरण एकट्याने लढलोय. पण पक्षही माझ्यासोबत आहे. आमचा राम बहुजन आणि जात-पात न मानणारा आहे. तुमचा राम निवडणुकीपुरता आहे. आमचा राम आमच्या ह्रदयात असतो. ज्यांच्या डोक्यात वर्णव्यवस्था आहे त्यांच्याविषयी मी काय बोलणार? असा सवालही आव्हाड यांनी केलाय. 

Jitendra Awhad Live : माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, खेद व्यक्त करतो : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Live : मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. हा वाद मला वाढवायचा नाही. मात्र, जे याच्याविरोधात उभे राहिलेत त्यांच्यासाठी सांगतो की, वाल्मिकी रामायणाच्या श्लोक 10 मध्ये यासंदर्भात काही उल्लेख आहेत, असा दावा आव्हाड यांनी उल्लेख केलाय.  मला आयआयटी मधील अनेक मुलांनी काही कागदपत्र पाठवली आहेत. माझ्याकडून कधीही इतिहासाचे विकृतीकरण होत नाही. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, खेद व्यक्त करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणाले. 

Nashik protest against Jitendra Awhad : नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी 

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं श्रीराम मांसाहारी होते हे वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरत असून राज्यभर आंदोलन करत आव्हाडांचा निषेध नोंदवण्यात येतोय. नाशिकमध्ये साधू महंतांपाठोपाठ शिवसेनाही आक्रमक झाली असून मायको सर्कल परिसरात शिवसेना कार्यालयाबाहेर जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात येऊन जीतूद्दीन ओवेसीच्या बैलाला हो अशी घोषणाबाजी करण्यात येऊन जय श्रीरामचा जयघोषही करण्यात आला.

Jitendra Awhad Nashik : आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात शरद पवारांनी हिंदू समाजाची माफी मागावी : 'विहिंप'ची मागणी

Jitendra Awhad Nashik : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आव्हाड यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही विहिंपने शरद पवारांकडे केली आहे. "जितेंद्र आव्हाड यांनी जाणून बुजून हे वक्तव्य केले आहे. देशात राममय वातावरण होत असताना हिंदू समाजामध्ये जातीवाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न" असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे. 

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हासहमंत्री सुरेंद्र महाले यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आव्हाड यांनी रामबाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजप आणि विश्व हिंदू परिषद आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. 

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करा; नाशिकचे साधू महंत पोलीस ठाण्यात  

नाशिक : जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काळाराम मंदिर संस्थानचे महंत सुधीर पुजारी यांच्यासह हिंदू धर्मीय नुकतेच पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे आम्ही आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत, असे सुधीर पुजारी यांनी म्हटले आहे.

Ram Kadam : जितेंद्र आव्हाडांना अटक करा : राम कदम

Ram Kadam : श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा, पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची, राम भक्तांची माफी मागावी, भव्यदिव्य राममंदिर बनतंय यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय, असं राम कदम म्हणाले आहेत. तसेच, जितेंद्र आव्हाडांना अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे. 

पार्श्वभूमी

Jitendra Awhad State News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वाद उफाळला आहे. "राम हा बहुजनांचा आहे. तो मांसाहारी होता. वनवास भोगत असताना त्याने मांसाहार केला", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चांगलाच आक्रमक झालाय. आव्हाड यांच्याविरोधात घाटकोपर आणि पुण्यातील अलका चौकात  भाजपने आंदोलन सुरु केलय. आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात भाजप आमदार राम कदम यांनी तक्रार दाखल केली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.