मुंबई : राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडल्यानंतर (NCP Crisis) सुरुवातीचे काही महिने अगदी शांतपणे गेली. नेते एकमेकांना भेटायचे, कार्यकर्ते एकमेकांशी बोलायचे असं सर्व काही आलबेल असल्यासारखं चित्र होतं. अजित पवार गटाकडून कर्जतमध्ये पक्षाचा मेळावा घेतला आणि राष्ट्रवादीतील ही फुट आणि नेत्यांतील वाद मात्र चव्हाट्यावर आला. अजित पवारांनी शरद पवारांबद्दल अनेक गौप्यस्फोट केले तर शरद पवार गटाकडूनही त्याच भाषेत उत्तर देण्यात आलं. आता शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळची अजित पवारांची उक्ती आणि आताची कृती ही वेगळी असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलंय


जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवारांनी शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसतंय. शिंदे गटाने शिवसेनेतून फुटल्यानंतर पक्षाचे नाव आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकला. निवडणूक आयोगातील लढाईही त्यांनी जिकंली होती. त्यानतंर अजित पवारांनी एका जाहीर सभेत त्यावरून एकनाथ शिंदेंवर चांगलीच टीका केली होती. त्यामध्ये अजित पवारांनी शिंदे गटाला शिवसेना पक्ष न चोरता नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिल्यांच दिसतंय. 


या व्हिडीओमध्ये अजित पवार काय म्हणाले? (Jitendra Awhad Shared Ajit Pawar Video) 


ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि वाढवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला. हा निर्णय जरी निवडणूक आयोगाने घेतला असला तरी जनतेला तो पटलाय का? याचाही विचार झाला पाहिजे. अरे तुमच्यात जर धमक होती तर काढा ना वेगळा पक्ष, कुणी अडवलं होतं. 


 




काय म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी? 


दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्रजी पावर साहेबांनी दिला, त्याच पालन पोषण ही पवार साहेबांनी केल, त्याच संगोपन पुढे पवार साहेबांनीच केल. राष्ट्रवादी पक्ष वाढला हादेखिल पवार साहेबांमुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण  देशभरात. मग, जस आपण म्हटलात तस घ्या ना आणि एक नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करुन दाखवा.


ही बातमी वाचा :