मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भुजबळ एवढ्या सभा का घेत आहेत, ते महाराष्ट्र अस्थिर का करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. ते मंत्री आहेत, त्यांनी मंत्रिमंडळात त्यांची भूमिका मांडली पाहिजे, तसे नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असंही ते म्हणाले, 


जे सुरवातीला आरक्षणाच्या विरोधात बोलायचे ते आता ओबीसींची बाजू घेत आहेत, इंदिरा सहाणी खटल्याच्या निकालानुसार 50 टक्केच्या पुढे आरक्षण नेता येणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द होऊ शकत नाही. मग एवढ्या मोठ्या सभा का घेत आहेत? आजही भुजबळांना आम्ही आमचे ओबीसी नेते मानतो. पण त्यांच्या प्रत्येक शब्दात अंगार का बाहेर पडतोय? ओबीसी आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी खूप प्रयत्न केले. मात्र आता त्यांची भूमिका पटत नाही. भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे. शांत आणि स्थिर महाराष्ट्र आपण अस्थिर करतोय. वितुष्ट निर्माण झाल्यावर ते संपवता येणार नाही.


भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत, जेष्ठ मंत्री आहेत. मग ते कसे बोलतात की ओबीसींना पैसे कमी मिळतात. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे मंत्रिमंडळावरचा अविश्वास आहे. तसे असेल तर मंत्रिपदी का राहता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. 


सरकारवर सडकून टीका


मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण कसं देणार ते सांगा ना? तुम्ही आंदोलन का पेटवलं? का लाठीचार्ज का केला? त्यात तुमची आंदोलन पेटवण्याचा चुकीचा हेतू होता का? त्यामुळे महाराष्ट्र तुम्ही पेटवला का? आरक्षण देण्याच्या संदर्भात कायदेशीर काय आहे हे का सांगत नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत तुम्हाला ही धकधक सुरु ठेवायची आहे का? आतापर्यंत तुम्ही धर्म समोर केले, आता जात समोर करत आहात. मराठी माणसाचं रक्त सांडणार याची तुम्हाला लाज वाटत नाही का? त्या मंत्र्यांचं वय पाहता, त्याचा अनुभव पाहता जरागे यांचं पहिलं आंदोलन आहे. 


ही बातमी वाचा: