रत्नागिरी : महाडच्या (Mahad) आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने (BJP) केलाय. भाजप आणि आरपीआय आज आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलनं करत आहे. नागपुरातही भाजपच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. कोल्हारपुरातही आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसंच ठाण्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली भाजपनं आंदोलन केलं, तर मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपने आव्हाडांविरोधात आंदोलन केलं.
हिंगणघाट येथे भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांचा बोलवता धनी शरद पवार असून भविष्यात आव्हाडांना हिंगणघाटमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार कुणावार यांनी दिला आहे.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात जोडो मारो आंदोलन
जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर भाजपकडून आंदोलन करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले आहे.
भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
माणगांवमध्ये भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई गोवा हायवेवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आव्हाडांच्या प्रतिमेचंही दहन केलं. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.
सांगलीत जोडेमारो आंदोलन
सांगलीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन झाले आहे. या आंदोलनात भाजपा आमदार सुधीर गाडगीळ, आरपीआय नेते जगन्नाथ ठोकळे, राष्ट्रवादी पदाधिकारी जयश्री पाटील अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
नांदेडमध्ये जोडे मारो आंदोलन
नांदेडमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजप कार्यकर्त्यांकडून जोडे मारले. नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आलं . यावेळी आव्हाडांच्या अटकेची मागणी करण्यात आली.
रत्नागिरीत आव्हांडाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
रत्नागिरी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपचं जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले आहे. आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.
जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक
जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक आहे. मुंबईत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वखाली मंत्रालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
माणगाव भाजप आंदोलन
माणगांवमध्ये भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. भाजप कार्यकर्ते उतरले रस्त्यावर आहेत. मुंबई गोवा हायवेवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आव्हाडांच्या प्रतिमेचंही दहन केलं. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.
हे ही वाचा :