एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/03/2018

  1. लातूरच्या शेतकऱ्यांची आयकर विभागाकडून क्रूर चेष्टा, 1993 साली संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यावर दीड कोटीपर्यंतचा प्राप्तिकर भरण्याची नोटीस https://goo.gl/CdSy3Y


 

  1. राज्य मागास आयोगाच्या सुनावणी दरम्यान सदस्यांच्या झोपा, तर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंवर शाईफेक https://goo.gl/hAaTJ5


 

  1. राज्यात टप्प्या-टप्प्यानं प्लास्टिक बंदी होणार, पर्यावरणमंत्री रामदास कदमांची घोषणा, प्लास्टिक विक्री केल्यास दंडात्मक कारवाई https://goo.gl/SL32wn


 

  1. औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना कचराप्रश्न भोवला, दोन्ही आयुक्तांच्या बदल्यांचे सरकारचे आदेश, नेते मात्र सुशेगाद https://goo.gl/RQ4gcj


 

  1. सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग, कोकण, मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर http://abpmajha.abplive.in/


 

  1. सामान्यांसह आमदारांसोबतही रिक्षाचालकांची मुजोरी, आमदारांनी विधिमंडळात मांडली कैफियत, आमदारांच्या तक्रारीनंतर रिक्षा-टॅक्सीत टोल फ्री क्रमांक लिहिणं अनिवार्य https://goo.gl/kcjSvc


 

  1. MPSC प्रक्रियेवरील मुंबई उच्च न्यायालयानं लावलेली स्थगिती मॅटकडूनही कायम. केवळ आरटीओ संदर्भातले निकाल जारी करण्याची मुभा https://goo.gl/ZT43aU


 

  1. मालमत्ता कर थकवणाऱ्यांची नावं बॅनरवर आणि बॅनर सोसायटीवर, वसुलीसाठी ठाणे मनपाची युक्ती https://goo.gl/WcNG1D


 

  1. मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम सोमवारी अविश्वास ठराव मांडणार, समाजवादी पार्टीचा पाठिंबा, तर शिवसेना तटस्थ राहणार https://goo.gl/h6jNHd


 

  1. हरियाणात 12 वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्याला फाशी, मध्य प्रदेश-राजस्थाननंतर कठोर निर्णय घेणारं देशातलं तिसरं राज्य https://goo.gl/2oofGT


 

  1. गर्भवती पत्नी सोडून गेल्याने विरारमध्ये तरुणाची लोकलसमोर उडी, आत्महत्येपूर्वी व्हिडीओतून पालकांची माफी https://goo.gl/uT9mvs


 

  1. लोकलमध्ये दिव्यांगांच्या डब्यातील घुसखोरांना एक लाखांचा दंड किंवा दोन वर्ष तुरुंगवास, नव्या कायद्याने प्रवाशांमध्ये घबराट https://goo.gl/95kgSu


 

  1. अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर, आपल्या प्रकृतीसंर्भात इरफानची माहिती, पुढील उपचारासाठी विदेशात जाणार https://goo.gl/Ct8unx


 

  1. पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, मानवी तस्करी प्रकरणात दोषी, शिक्षा सुनावल्यानंतर जामीन मंजूर https://goo.gl/pYpT9L


 

  1. फ्लोरिडामध्ये आठपदरी हायवेवर नव्याने बांधलेला पादचारी पूल कोसळला, आठ वाहनं चिरडून चौघांचा मृत्यू https://goo.gl/5ZyywB


 


*BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, जिभेचे चोचले : अजब गजब ‘सोशल्स’ https://goo.gl/o5TgFt

*माझा विशेष* : भाजपला मित्र पक्ष सांभाळता का येत नाहीत?, विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive   

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*