सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या राजवर्धन (Rajvardhan Patil) या धाकट्या मुलाचे प्रेमप्रकरण समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीच मुंबईतील पत्रकार परिषदेत राजवर्धन यांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या अनोख्या पद्धतीने प्रपोजचा किस्सा सार्वजनिक केला आहे. राजवर्धन यांनी नुकतंच आपल्या भावी पत्नीला प्रपोज केलं आहे. ते ही हटके स्टाईलमध्ये. '
मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं, स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं, शरद पवारांचा हल्लाबोल
पॅरिसमध्ये जगप्रसिद्ध अशा थेट आयफेल टॉवरवर जाऊन राजवर्धन यांनी आपल्या प्रेयसीला प्रपोज केल्याने आणि खुद्द शरद पवारांनी हा किस्सा सार्वजनिक केल्याने राजवर्धन यांच्या प्रेम प्रकरणाची आणि हटके प्रपोज स्टाईलची चर्चा सुरु झालीय. पवार यांनी हा किस्सा सांगत असताना आजची पिढी काय करेल हे सांगत असताना आमची पोरं काय करतील याचा नेम नाही असे देखील पवार म्हणालेत.
राजवर्धनच्या प्रपोजचा किस्सा सांगताना पवार म्हणाले!
कालच्या पत्रकार परिषदेच्या आधी शरद पवार यांनी सांगितलं की, जयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. दोघांचं जुळलं. पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, आमचे इथे सर्व सहकारी आहेत, त्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टीकोण किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांचे चिरंजीवांनी काल संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता आम्ही वाळवा, इस्लामपूरपर्यंत सीमित नाही आहोत. आम्ही एकदम पॅरिस वगैरे जातो. ठिकाणं इंटरनॅशनल असेल. पण दोघेही स्थानिकच आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल, असं सांगतानाच आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असं मिश्कीलपणे शरद पवार म्हणाले.