Jayant Patil :  पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता केंद्रातील सरकार आता आपलेच आहे, या भावनेने आता राज्याची तिजोरी रिकामी केली पाहिजे. केंद्र सरकारची मदत येईल तेव्हा येईल असे मत राष्ट्रकवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी व्यक्त केले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत अशी कृपा करू नये. एनडीआरएफचे निकष आता जुने झाले असून महागाई वाढली आहे. संकटही तितकेच मोठे आहे. त्यामुळं सरकारने पूरग्रस्तांना भरीव अशी मदत द्यावी, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

Continues below advertisement

एका एकरसाठी 50 हजार रुपये मदत द्यावी 

पूरग्रस्तांसाठी दिलेले 5 हजार रुपये फार कमी आहेत. 10 ते 15 हजार रुपये देणे गरजेचे होते, सरकारने तातडीने ती मदत द्यावी असे मत जयंत पाटीलयांनी व्यक्त केले. एका एकर साठी 50 हजार रुपये मदत द्यावी असेही जयंत  पाटील म्हणाले. कर्जमाफी देण्याची ही योग्य वेळ आहे. मराठवाड्यात अनेकांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे आता कर्जमाफी द्यावी असे पाटील म्हणाले. केंद्राकडून मदत येईल याची वाट न पाहता राज्य सरकारने आता आपली तिजोरी रिकामी करावी असेही ते म्हणाले. 

मराठवाडा आणी पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान 

मराठवाडा आणी पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नाराज झालेला आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मोठे कार्यक्रम टाळावेत याबाबत विचारले असता कोणते कार्यक्रम करायचे आणि कोणते नाही हे ज्याच्या त्याचा निर्णय आहे असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. शेतकरी संकटात असताना कर्जमाफी करण्याचा सरकारने निर्णय घेतला तर तो शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल असेही ते म्हणाले. 

Continues below advertisement

कर्जमाफीसाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी  योग्य वेळ आली की कर्जमाफी देऊ असे सांगितले होते. आता कर्जमाफीसाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. निवडणूक आल्यावर कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत असताना कर्जमाफी दिली तर तो लाभदायक ठरेल. निराशेतून मराठवाड्यासह संपूर्ण गेल्या सहा महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीये. सरकारने कर्जमाफी केली तर आत्महत्याचे प्रमाण पूर्णपणे थांबेल. त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय आत्ताच घ्यावा त्यासाठी नवा मुहूर्त काढू नये असेही जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना सरकारला कानपिचक्या दिल्या.

महत्वाच्या बातम्या:

Jayant Patil On Gopichand Padalkar: स्वत:च्या गावात नव्हे, दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात, हे शंकास्पद; जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा