अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात एरंडगावात आख्खा चर खोदून जायकवाडी बॅक वॉटरचं पाणी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. या पाणीचोरीचे काही फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत.


 

जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून सोडण्यात आलेलं पाणी काढण्यासाठी अक्षरशः या गावात मोटारींचं एक जाळचं तयार करण्यात आलं आहे.

 

एकीकडे मराठवाडा आणि नगरच्या काही भागात तीव्र पाणीटंचाई आहे. अशा प्रसंगात हा प्रकार म्हणजे पाण्यावर दरोडा टाकण्यासारखाच आहे.

 

यापूर्वी एबीपी माझा’ने बातमी दाखवल्यानंतर जायकवाडीच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं.

 

जायकवाडीचं पाणी चोरण्यासाठी गेल्या 15 दिवसात 30 फूट खोल आणि एक किलोमीटर लांब चर खोदण्यात आली होती. याप्रकरणी ‘एबीपी माझा’ने बातमी दाखवल्यानंतर सुभाष सिसोदे, लक्ष्मण नेहे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातमी


माझा इफेक्ट : जायकवाडीच्या पाण्यावर दरोडा घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल