सांगली: जत शहरातील सातारा रोड आणि उमराणी रोडवर असलेल्या पारधी तांडयावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. यात जिलेटीनच्या कांडया, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडीचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. तर सहा संशयित मोटारसायकलींसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान उमराणी रोडवरील तांडयातील शिवाजी प्रल्हाद चव्हाण आणि संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या घराची कसून झडती घेतली असता, एका पोत्यात जिलेटीन कांडया, गॅस टाकी, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्कीचे केबल कट करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.
उमराणी रोडवरील तांडयातच सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह कर्नाटकातील सहा मोटर सायकली मिळून आल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत.
जत शहरातील वाढती घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्की कंपनीच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनेमुळे, चोरटयांनी जत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी तसेच तपासासाठी जत पोलिसांनी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे पारधी तांड्यावर अतिरिक्त फौजफाटा देत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची परवानगी मागितली होती.
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले होते. चौकशी नंतर त्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी ज्या सहा मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत त्या चोरीतील आहेत का याचाही तपास सुरू केला आहे. कोम्बिंग ऑपरेशनमुळे भुरट्या चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
जतमध्ये पारधी तांड्यावर पोलिसांची धाड, काय काय मिळालं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2018 10:37 AM (IST)
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान उमराणी रोडवरील तांडयातील शिवाजी प्रल्हाद चव्हाण आणि संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -