17 जानेवारीला पाचवीतील चिमुरडीवर बलात्कार घडतो. स्वत:ला आई-वडील म्हणवणारे नराधम पोलिसात न जाता जात पंचायतीकडे धाव घेतात. न्यायाचा ठेका घेतलेली जात पंचायत चक्क मटणाची पार्टी आणि 12 हजार रुपयांच्या दंडावर मांडवली करते. यानंतर जातीचे ठेकेदार मटणावर तावही मारतात. मात्र जेव्हा बलात्कारी दंडाची रक्कम भरत नाही, तेव्हा कर्मदरिद्री पालक पुन्हा जात पंचायतीचा धावा करतात. मात्र जातपंचायत हात वर करते आणि अखेर पीडित मुलीच्या नशिबानं प्रकरण पोलिसात जातं आणि तक्रार दाखल होते आणि प्रकरणाला वाचा फुटते.
बलात्कार, जातपंचायत आणि जातीच्या ठेकेदारांचं हे भयाण वास्तव दुसरं-तिसरं कुठे नाही, तर याच पुरोगामीपणाचा तोरा मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील आहे.
दरम्यान, 24 जानेवारीला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 व्या शतकातही जर अशा घटना घडत असतील तर कुठे आहे महिला सबलीकरण आणि कशासाठी आहे बेटी बचावचा टाहो हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
VIDEO : पाहा या प्रकरणाचा स्पेशल रिपोर्ट :