Janmashtami Dahi Handi 2023 : राज्यभरात दहीहंडीचा उत्साह; मुंबई, ठाण्यात थरांचा थरार

Janmashtami 2023 : आज श्रीकृष्ण जन्माष्टमी... या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक भागात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Sep 2023 11:37 PM
मुंबईत 107 गोविंदा जखमी; 14 जण गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू, आकडा वाढण्याची शक्यता

मुंबईत गोविंदा साजरा करताना थर कोसळून झालेल्या अपघातात 107 गोविंदा जखमी झाले आहेत. रात्री 9 वाजेपर्यंतची आकडेवारी मुंबई महापालिकेने दिली.  अधिक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

ठाण्यात दहीहंडी उत्सवात 17 गोविंदा जखमी; कोणीही गंभीर जखमी नाही

ठाण्यात दहीहंडी उत्सवात 17 गोविंदा जखमी...


जखमींवर कळवा रुग्णालय व सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू...


गोविंदांच्या पायाला, हाताला तर कमरेला काही प्रमाणात दुखापत झाली आहे...


कोणताही गोविंदा गंभीर जखमी नाही...

Palghar-Chinchani Dahi Handi 2023 : चींचणीची आगळी वेगळी दहीहंडी... दहीहंड्या फोडण्यासाठी कसरत

चींचणी : पालघर जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत असून यावर्षी पालघरमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील कोळी वाड्यातील दहीहंडी पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात येत असून या भागात पारंपरिक पद्धतीने लाकडी खांबावर वर्तुळाकार आकारात 101 दहीहंडी बांधण्यात येतात. हंडी बांधल्यानंतर खांबाला वंगण म्हणजेच ग्रीस लावण्यात येते. स्थानिक कोळीबांधव गोविंदा ह्या लाकडी खांबाभोवती वर्तुळाकार पद्धतीने एकत्र येत एकमेकांच्या खांद्यावर चढत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. अखेर 2 ते 3 तासांच्या प्रयत्नानंतर गोविंदांना हंडी फोडण्यात यश येते.

Dahi Handi 2023 : मीरा-भाईंदर येथील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री अमिषा पटेलची हजेरी

भाईंदर :  मीरा-भाईंदर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रवी व्यास यांच्या दहीहंडी उत्सवात गदर 2 ची अभिनेत्री अमिषा पटेल हिने हजेरी लावली.

Dahi Handi Ratnagiri : साखळी दहीहंडीची परंपरा, गावात घरोघरी जाऊन दहीहंडी फोडण्याची पद्धत

रत्नागिरी : गुहागरमधील जानवळे येथे गेली अनेक वर्षांपासून साखळी दहीहंडीची परंपरा आहे. मानवी साखळी करत संपूर्ण गावातल्या घरोघरी जाऊन दहीहंडी फोडण्याची मागील अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे. यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीने गोविंदा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. गुहागर मधील हा गोविंदा उत्सव पाहण्यासाठी अनेक भागातून मोठी गर्दी गेली जाते.

Bhiwandi Dahi Handi 2023 : भिवंडीत भाजपाच्या कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने दहीहंडीचे आयोजन, 25 लाख रुपयांचे बक्षीस

Bhiwandi Dahi Handi 2023 : भिवंडीत भाजपाकडून कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून यंदा 17 वं वर्ष आहे. तसेच कोरोना काळात लाखो नागरिकांना जेवणाचे वाटप करुन मोलाचे योगदान देणाऱ्या संस्थाच्या हस्ते या दहीहंडीचे उद्घाटन करण्यात आले हे विशेष. भिवंडीच्या दहीहंडीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच सिने अभिनेत्री गदर फेम अमिषा पटेल आदी कलाकार यांची उपस्थिती राहणार असून या सोहळ्यासाठी एकूण बक्षीस 25 लाख रुपये ठेवण्यात आले आहे.

Thane Dahi Handi 2023 : संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात हिंदू एकता गोविंदा पथकाकडून आठ थरांची सलामी

Thane Dahi Handi 2023 : संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात हिंदू एकता गोविंदा पथकाकडून आठ थरांची सलामी देण्यात आली आहे. हिंदू एकता गोविंदा पथक नऊ थरांची सलामी देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे.

Worli Dahi Handi 2023 : वरळीत आशिष शेलार यांनी परिवर्तन दहीहंडी फोडली

Worli Dahi Handi 2023 : वरळीत आशिष शेलार यांनी परिवर्तन दहीहंडी फोडली. आदित्य ठाकरे यांच्या वरळीत आशिष शेलार यांनी हंडी फोडली.

Bhayandar Dahi Handi 2023 : भाईंदरमधील दहीहंडी उत्सवात बोरीवलीच्या ओम साई गोविंदा पथकाकडून आठ थरांची सलामी

Bhayandar Dahi Handi 2023 :  मीरा भाईंदर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रवी व्यास यांच्या मॅक्सेस मॅाल जवळच्या दहीहंडी उत्सवात बोरीवलीच्या ओम साई गोविंदा पथकाने आठ थरांची सलामी दिली आहे.

Thane Dahi Handi 2023 : लोकल ट्रेनमध्येही ठाण्यातील टेंभी नाक्याच्या दहीहंडीचं लाईव्ह प्रक्षेपण

Thane Dahi Handi 2023 : लोकल ट्रेनमध्ये देखील ठाण्याची टेंभी नाक्याची दहीहंडी लाईव्ह दाखवली जात आहे. ठाण्यातील मानाची हंडी आनंद दिघे यांनी सुरुवात केली होती. 

चिपळूणच्या डेरवण महाविद्यालयात बाळगोपाळांनी फोडली दहीहंडी

Chiplun Dahi Handi 2023 : रत्नगिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स डेरवण महाविद्यालयात आज गोकुळाष्टमीनिमित्त बाळगोपाळांनी फोडली दहीहंडी. यावेळी बाळगोपाळ श्रीकृष्ण आणि राधाची पारंपारिक वेशभूषा परिधान करुन आले होते. दहीहंडीच्या गाण्यांवर नृत्य करत बांधलेली दहीहंडी फोडली.

Dombivli Dahi Handi 2023 : डोंबिवलीत गतिमंद विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात

Dombivli Dahi Handi 2023 : डोंबिवलीतील दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे स्वराज्य दहीहंडी उत्सवास सुरुवात झाली. सकाळपासून कल्याण डोंबिवली डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे गोविंदा पथकामध्ये एकच उत्साह दिसून येत आहे. डोंबिवलीतील क्षीतिज संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात केली आहे. यावेळी गतिमंद विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून नाचत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.

9 थर लावले तर 11 लाख 11 हजारांचं बक्षिस तर 10 थर लावले तर तब्बल 25 लाखांचं बक्षिस, ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचं आयोजन

Thane Dahi Handi 2023 : नऊ थर लावले तर 11 लाख 11 हजारांचं बक्षिस तर 10 थर लावले तर तब्बल 25 लाखांचं बक्षिस ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडीने ठेवले आहे.  

Thane Dahi Handi 2023 : ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठानमध्ये शिवप्रतिष्ठान गोविंदा पथकाकडून सात थर लावत सलामी

Thane Dahi Handi 2023 : ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठानमध्ये अनेक गोविंदा पथके आता दाखल होताना दिसत आहेत. शिवप्रतिष्ठान गोविंदा पथकाकडून सात थर लावत सलामी दिली आहे. अद्याप कोणत्याही पथकाने आठ थर लावले नाहीत, त्यामुळे कोणतं गोविंदा पथक ते लावतात याची उत्सुकता आहे.

Mumbai Dahi Handi 2023 : मुंबईतील प्रसिद्ध दहीहंडी अखिल गोविंदा पथकाने 8 थर लावून फोडली

Mumbai Dahi Handi 2023 :  मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध आयडियल दहीहंडी अखिल गोविंदा पथकाने फोडली आहे. अखिल गोविंदा पथकाने 8 थर लावून ही दहीहंडी फोडली.

Thane Dahi Handi 2023 : ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला थोड्याच वेळात होणार सुरुवात

Thane Dahi Handi 2023 : ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, 


गोविंदा पथक येण्यास झाली सुरुवात, 


मुंबई ठाण्यातली मानाची हंडी म्हणून या उत्सवाला आहे मान 


प्रत्येक पथक इथे येऊन सलामी देऊन मगच पुढे जातात 


धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा उत्सव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित करत आहेत

Mumbai Dahi Handi 2023 : मुंबईत भाजपच्या 400 दहीहंडी; लालबागमध्ये बदलाची तर वरळीत परिवर्तनाची दहीहंडी

Mumbai Dahi Handi 2023 : मुंबईत आज भाजपच्या वतीने 400 दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली आहे तर वरळीत परिवर्तनाची दहीहंडी भाजपने उभारली आहे. "तरुणांना आनंद मिळावा यासाठी 400 पेक्षा जास्त ठिकाणी दहीहंडीचं नियोजन केलेलं आहे. तरुणांमध्ये उत्साह आहे. अनेक गोविंदा पथकांना निमंत्रण देण्यात आलं आहे," असं आशिष शेलार म्हणाले. निवडणुकीच्या तयारीविषयी बोलताना शेलार म्हणाले की, "संपूर्ण मुंबईत भाजप काम करतं आहे. गल्लीत लपून छपून पॉकेट काम उभाठा करतं आहे. प्रचाराचा नारळ म्हणता नाही येणार, पण बदलासाठी भाजप काम करत आहे."

Mumbai Dahi Handi 2023 : मुंबईत भाजपच्या 400 दहीहंडी; लालबागमध्ये बदलाची तर वरळीत परिवर्तनाची दहीहंडी

Mumbai Dahi Handi 2023 : मुंबईत आज भाजपच्या वतीने 400 दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली आहे तर वरळीत परिवर्तनाची दहीहंडी भाजपने उभारली आहे. 

Thane Dahi Handi 2023 : ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीसाठी जय जवान आणि शिवसाई गोविंदा पथक 9 थर रचणार, तर राज ठाकरेंच्या उपस्थितीत 10 थर रचून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार

Thane Dahi Handi 2023 : ठाण्यात मनसेच्या दहीहंडीची जोरदार चर्चा सुरु आहे. अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडीसाठी जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक 9 थर रचणार आहेत. तर राज ठाकरे संध्याकाळी 6 वाजता येतील आणि त्यांच्या उपस्थितीत जय जवान गोविंदा पथक 10 थर रचून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मनसेने 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचं पारितोषिक जाहीर केलं आहे.

Thane Dahi Handi 2023 : प्रताप सरनाईक यांच्या हंडीची सुरुवात नऊ थरांनी होणार

Thane Dahi Handi 2023 : प्रताप सरनाईक यांच्या हंडीची सुरुवात नऊ थरांनी होणार आहे. जय जवना आणि कोकण नगरची मंडळं दाखल झाली आहेत. पूर्वेश सरनाईक ही हंडीच्या ठिकाणी दाखल झाले आहेत

Mumbai Dahi Handi 2023 : भाजपच्या वतीने मुंबईमध्ये यंदा 400 ठिकाणी दहीहंडीचे आयोजन

Mumbai Dahi Handi 2023 : भाजपच्या वतीने मुंबईमध्ये यावर्षी 400 ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. लालबाग येथील साईबाबा पथ येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडीला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.

ठाण्यातील टेंभी नाक्यावर दहीहंडी पथक दाखल, मानाच्या दहीहंडीला सलामी देण्यासाठी पथक सज्ज

Thane Dahi Handi 2023 : ठाण्यातील मानाची हंडी आनंद दिघे यांनी सुरुवात केली होती. टेंभी नाका इथे पहिल्या गोविंदा पथकाचे आगमन झाले आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना त्या पावसाचा आनंद घेत हे पथक ठाण्यात दाखल झालं आहे. मुलुंड येथील साईराज गोविंदा पथकाचे गोविंदा सलामी देण्यासाठी सज्ज आहेत. पाऊस कोसळत असला तरी त्यांच्या उत्साह कुठेही कमी झालेला नसून या मानाच्या हंडीच्या ठिकाणी सलामी देणे हेच आम्ही मानाचं समजतो अशी भावना गोविंदा व्यक्त करत आहेत.

आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवला

Janmashtami 2023 : आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून समाधीवर श्रीकृष्णाचा अवतार रेखाटण्यात आला होता. भाविकांनी जन्माष्टमीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांचे कीर्तन झाले, तर गोकुळ पूजा विश्वस्त ॲड विकास ढगे यांच्या हस्ते करण्यात आली.

Dahi Handi 2023 : नागपुरात सहा थरांवर दहीहंडी फोडली, नितीन गडकरींची उपस्थिती

Dahi Handi 2023 : नागपुरात बडकस चौक मित्र परिवारातर्फे गोकुळाष्टनिमित्त आयोजित दहीहंडी स्पर्धेत आठ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. दहीहंडी फोडण्यासाठी थरांचा थरार सुरु होता. यावेळी गोविंदा पथकांची दहीहंडी फोडण्याची ही चुरस पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. सहा थरावर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही काही वेळ उपस्थित होते.

पार्श्वभूमी

Janmashtami 2023 : आज श्रीकृष्ण जन्माष्टमी... या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने देशातील श्रीकृष्णाच्या लाखो मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. रांचीमध्ये जन्मोत्सवाचा उत्सवानंतर मध्यरात्री दहीहंडी फोडण्यात आली. मथुरेतही कृष्णजन्माष्टमीचा जोरदार जल्लोष करण्यात आला. ठिकठिकाणी श्रीकृष्णाच्या मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर मुंबईसह देशभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये भक्तीचा सागर दिसून येत आहे. आज कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने देशभर उत्साह आहे.


श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबईमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रात्री बारा वाजता मुंबईतील अनेक भागात मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तरुणांनी अनेक थर रचत दहीहंडी फोडली आणि आनंद घेतला. मुंबईतील दादर, नायगाव, वरळी, लोअर परळ आणि मुंबईतील सर्वच परिसरात मोठ्या उत्साहाने दहीहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. आजही मुंबई ठाण्यासह ठिकठिकाणी थरांचा थरार पाहायला मिळेल.


देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami 2023) उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दरम्यान, मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि हाच उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा (Shri Krishna) जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रुपात कंसाच्या कैदेत झाला. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात. 


श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने घरोघरी बाल गोपाळांचा जन्म झाला आहे. सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल कीच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाले आहे. श्रीकृष्णाचा भक्त बालगोपाळांच्या पूजेत तल्लीन असतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होताच घराघरात अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. असं मानलं जातं की ज्या पद्धतीने तुम्ही घरातील लहान मुलाला झोपण्यासाठी अंगाई गाता. त्याचप्रमाणे बाळ कृष्ण गोपाळांनाही एक अंगाई गा. कारण आई यशोदा सुद्धा कान्हाची झोप उडवण्यासाठी लोरी गात असे. लोरीमध्ये तुम्ही भक्तीगीते किंवा फक्त कान्हाची लोरी गाऊ शकता.


विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा 


विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी शेकडो विठ्ठल भक्ताने या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यापूर्वी विठुरायाला अनोख्या रुपात सजविण्यात आले होते. डोक्यावर पगडी, अंगावर अंगी, धोतर आणि त्यावर मोठी कुंची घालण्यात आली होती. गुरख्याचे रूप दिलेल्या विठुरायाच्या हातात चांदीची काठी देऊन देवाच्या मागे मोरपिसे लावण्यात आली होती. विठुराया हा विष्णूचा अवतार असल्याने विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो . विठ्ठल सभामंडपात जन्माष्टमीचे कीर्तन सुरू असताना रात्री 12 वाजता पाळण्यात कृष्ण जन्माचा उत्सव करण्यात आला. यावेळी भाविकांनी देवाच्या पायावर गुलाल, अष्टगंध वहात दर्शन घेतले.


शिर्डीच्या साई मंदिरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह


देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव श्रद्धने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. रात्री बारा वाजता चांदीच्या पाळण्यात बाल कृष्णाची मूर्ती ठेवून कीर्तन झाल्यानंतर कृष्णजन्माचे स्वागत करण्यात आले. आज दिवसभर साई समाधी शेजारी गोपाल कृष्णाचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाईल. साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानणारे हजारो भाविक आज साई समाधीचे दर्शन घेतील.


महत्त्वाच्या बातम्या : 


Janmashtami 2023 : यंदा कृष्ण जन्माष्टमी 6 की 7 सप्टेंबरला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.