Jammu Kasmir Attack: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा समावेश आहे .यात डोंबिवलीतील 3 जण, पुण्यातील दोन व पनवेल मधील एका पर्यटकाचा मृत्यू झालाय .(Pahalgam Terror Attack)  मंगळवारी दुपारी (22 एप्रिल ) देशी विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करत गोळ्यांच्या फैरी झाडणार्‍या या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण भारत हादरलाय . मार्चमध्ये झालेल्या बर्फदृष्टीनंतर अनेक पर्यटक काश्मीरला येतात . यंदा पर्यटक वाढल्याने कश्मिरी नागरिक ही आनंदात असताना सर्वसामान्य पर्यटकांना टारगेट करत हा भ्याड हल्ला करण्यात आला . हा हल्ला झाला त्यावेळी जालना, नांदेड धाराशिव, परभणी, बीड तसेच भंडारा, जळगाव ,सांगली ,संगमनेर अशा बहुतांश जिल्ह्यांमधून पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत . महाराष्ट्रातील अनेक जण सुट्ट्या असल्याने काश्मीरला फिरायला गेले होते. (Marathwada Tourist)  हल्ला झाल्याचं कळताच फिरायला गेलेल्या पर्यटकांची पाचावर धारण बसली. अनेकांनी सुखरूप स्थळ गाठले. नातेवाईकांसह प्रशासनाला कळवत आपले थरारक अनुभव ही सांगितले आहेत.

Continues below advertisement

पहलगाममध्ये सहकुटुंब फिरायला गेले तोच हल्ल्याची माहिती मिळाली..

पहलगाम इथं दहशतवादी हल्ला घडला त्यानंतर काय घडलं हे धाराशिवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सांगितला आहे .हल्ला झाला त्यावेळी ते पहलगाम या बिराजदार परिसरात होते .त्या ठिकाणापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर ते होते .त्यांनी सांगितलं,आम्ही तिकडे निघालो होतो तोपर्यंत हल्ल्याची माहिती आली. त्यावेळी सुरेश बिराजदार त्यांच्या कुटुंबीयांसोबत पहलगाम परिसरात पर्यटनासाठी गेले होते .घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणात भारतीय सैन्य दलाने त्या परिसराला वेढा घातला होता .तात्काळ ॲम्बुलन्स परिसरात दाखल झाल्या .त्याचवेळी ड्रायव्हरने तात्काळ आम्हाला हॉटेलमध्ये आणलं .त्याचा धर्म वेगळा होता मात्र रात्रीतून तो सतत फोन करून आम्ही घाबरलो नाहीत ना हे विचारायचा .तुम्हाला हॉटेलमध्ये राहावं असं वाटत नसेल तर घरीही राहण्याची त्यांनी विचारणा केली या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिराजदार यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केल्याची माहिती त्यांनी दिली आहे .

सुट्टीला आई वडील व मुलगा तिघेही पहलगामध्ये गेले, पण दैव बलवत्तर

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या राजूर येथील एका कुटुंबातील तीन जण पहलगांमध्ये अडकले आहेत  . आई वडील व मुलगा तिघेही सुट्ट्या निमित्त काश्मीरला फिरायला गेले होते .संदीप साबळे यांच्या पत्नी तेजस्वी साबळे आणि मुलगा कौस्तुभ साबळे (5) हे तिघेही सध्या पहलगाम येथील हिल पार्क हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे .पहलगाम मध्ये हल्ल्याच्या दिवशी ते हॉटेलमध्येच असल्याने सुखरूप बचावल्याची माहिती त्यांनी दिली .

Continues below advertisement

तसेच जालना शहरातील संजय राऊत व इतर दोन जण बालाजी टूर तर्फे श्रीनगरला गेले होते .ते सध्या हॉटेल पाम पॅराडाईज येथे असून सुखरूप असल्याची माहिती आहे .

हल्ल्याच्या वेळी गुलमर्गला रवाना झाले ,नांदेडचे दोघेजण सुरक्षित 

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झालेल्या ठिकाणी असणारे नांदेड मधील दोन पर्यटक कृष्णा लोलगे तसेच आणखी एक तरुण  हल्ला होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी तिथून गुलमर्ग येथे रवाना झाले . ते सुरक्षित आहेत असे व्हिडिओच्या मार्फत त्यांनी सांगितलं आहे .हल्ला झालेल्या ठिकाणी चार दहशतवादी हल्लेखोर होते असे कृष्णा लोलगे यांनी सांगितले आहे .

धाराशिव जिल्ह्यातील मंगळूरमधील सुभाष भानदास दुर्गडे व त्यांच्या तीन मुली एक मुलगा तसेच इतर कुटुंब कश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेली होती .हे संपूर्ण कुटुंब अमृतसर मध्ये सुरक्षित आहे .सुभाष दुर्गुळे,यशोदा दुर्गुळे त्यांची मुलगी शुभ्रा सुजाता ऐश्वर्या. तसेच मुलगा दिग्विजय व अरुण तुकाराम जाधव सुखरूप आहेत .

परभणीतील भास्कर डांगे आणि त्यांचे कुटुंबीय कश्मीरमध्ये सुखरूप

परभणीचे भास्कर डांगे हे सहकुटुंब कश्मीर फिरायला गेले होते .काल हल्ल्याच्या वेळी पहेलगाम मध्येच ते होते .तिथून बैसरण घाटी येथे जाणार होते मात्र बारीक पाऊस सुरू झाल्याने ट्यूलिप गार्डन बंद राहणार असल्याची माहिती मिळाल्याने ठरलेला कार्यक्रम रद्द करून श्रीनगरला गेले .त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत . ते सध्या श्रीनगरला सुरक्षित आहेत .

हिंगोलीतील नवदाम्पत्य फिरण्यासाठी गेलं, दोघेही सुखरूप

हिंगोली शहरातील रहिवासी असलेले  शुभम अग्रवाल आणि रचना अग्रवाल यांचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर दोन जम्मू कश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते सध्या ते श्रीनगर येथे असून रात्री उशिरा ते श्रीनगर येथे पोहोचले आहेत सध्या ते एका हॉटेलमध्ये थांबले असून ते सुखरूप आहेत अशी माहिती शुभम चे वडील कैलास अग्रवाल यांनी दिली आहे पुढील फिरण्याचा संपूर्ण प्लॅन कॅन्सल करून परत येण्यासाठी घरच्यांनी त्यांना विनंती केल्याची सुद्धा माहिती आहे

हेही पहा: