Jalna news: मराठा आणि ओबीसी आरक्षण (Maratha-OBC reservation) प्रश्न राज्यात चांगलाच पेटलेला असताना आज जालन्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) जनआक्रोश यात्रा काढत आहेत. मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा  वाद शरद पवारांनी (Sharad Pawar) सोडवला पाहिजे. शरद पवारही जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवं असं म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधलाय.


मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. जरांगे पॉलिटिक्स स्क्रिप्ट वरती काम करत आहेत असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.दंगली घडवण्याची ओबीसींची बॅक हिस्ट्री नाही असं म्हणत महामानवांच्या पुतळ्याखाली बसून आम्ही कधी शिवीगाळ केली नाही. ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात तर आरोपाचे काय असा सवाल करत आमच्यात फूट पाडण्याचे काम जरांगे करत असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. या प्रश्नावर शरद पवारांनी बाेलायला हवं असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधलाय.


शरद पवारांनी हा प्रश्न सोडवायला हवा


मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा  वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे. शरद पवारही जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवं असं म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधलाय.


कोणाला टार्गेट करण्याचा हेतू नाही- हाके


जालन्यातील वडीगोद्री जवळील मंडल स्तंभापासून त्यांनी यात्रेला सुरुवात केली आहे. जालना जिल्हा ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी आहे. कोणालाही टार्गेट करण्याचा आमचा हेतू नसल्याचे ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले. महाराष्ट्रात कोणबींच्या बोगस नोंदी झाल्या आहेत. त्या किती झाल्यात हे सरकारने सांगावे अशी मागणी यावेळी लक्ष्मण हाके यांनी केली.


ओबीसींच्या मनात स्वाभिमान आणि विश्वास निर्माण करायला हवा


महाराष्ट्राच्या ओबीसींच्या मनात स्वाभिमान आणि विश्वास निर्माण केला पाहिजे. गावगाड्यातील सर्व लोकांनी आता एकत्रित आलं पाहिजे. तुमचा आरक्षण वाचवायला आता फुले शाहू आंबेडकर येणार नाहीत असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी जनाक्रोश यात्रेला सुरुवात केली आहे. 


जालना ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी


जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटीत किंवा वडीगोद्री गावातच उपोषण का करतात? अनेकांना वाटलं त्यांना कोणालातरी टार्गेट करायचं असेल, पण जालना जिल्हा ही ओबीसींच्या आंदोलनाची सुपीक भूमी आहे. मंडळ आयोग असताना जालना जिल्ह्यातून अनेक सभा झाल्या आहेत. मंडळ आयोगाच्या स्तंभाजवळून आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवत आहोत असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी जनअक्रोश यात्रेला जालन्यातील वडीगोद्री गावातून सुरुवात केली आहे.


महाराष्ट्रात ओबीसींची चळवळ उभी राहू शकली नाही. महाराष्ट्रात ओबीसी कधीही शासक होऊ शकला नाही. सत्ता शिक्षण आणि नोकरी पासून ओबीसी बेदखल झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने एकत्र यायला हवं.अशी हाक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला घातली.


हेही वाचा:


उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा खून केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल, मनोज जरांगेंनाही टोला