वापरलेलं तंत्रज्ञान पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
जालन्यातील पाच मुन्नाभाईंनी कॉपी करण्याच्या शर्यतीत 'मुन्नाभाई एमबीबीएस'लाही मागे टाकलं आहे. जालना जिल्हा निवड समितीच्या वतीने नगर समितीच्या लिपीक पदासाठी भरती परीक्षा सुरु होत्या. या बहाद्दरांनी कॉपी करण्यासाठी वापरलेलं हायटेक तंत्रज्ञान पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले.
सीटीएमके आणि जेएस कॉलेजमध्ये भरारी पथकाला कॉपी करणारे सात विद्यार्थी आढळले. त्यांच्याकडे स्कॅनर,
मोबाईल, ब्लूटूथ, हेडफोनसारखे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आढळले.
काय होती कार्यपद्धती?
पेपर स्कॅन करुन पलिकडच्या लॅपटॉपवर अपलोड केला जायचा. पलिकडे बसलेली व्यक्ती प्रश्नाचं 'अ,ब,क' अशी
बहुपर्यायी उत्तरं सांगायची. आरोपींनी बनियनमध्ये मायक्रोफोन लपवून शिवले होते. त्यावरुन उत्तर ऐकून लिहिलं जायचं.
याच परीक्षा सेंटरवर दोन डमी विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली आहे. एकूण सात आरोपींना अटक झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉपी करण्यासाठी लावलेली अक्कल आणि वेळ जर अभ्यासासाठी लावला असता तर हे नक्कीच मेरिटमध्ये आले असते.