जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या वलखेडा गावात दगडाच्या खाणीत अचानक स्फोट झाल्याने दोन सख्ख्या भावांना जीव गमवावा लागला. शुभम धोत्रे आणि शिवराज धोत्रे असे या दोन मयत मुलांची नावे आहे. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
गावातील वलखेडा शिवारात गट क्रमांक 22 मध्ये दगडाची खदान आहे. या खाणीत धोत्रे कुटुंब दगड फोडण्याचे काम करत होते. दुपारच्या वेळी मयत मुले खाणीजवळ खेळत असताना जुन्या खाणीत लावलेल्या स्फोटकांचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात उडालेल्या दगडांचा मार लागल्याने या मुलांचा जागीच मृत्यू झाला.
तालुक्यातील वलखेडा शिवारात गट नं. 22 मधील काकासाहेब कटारे यांच्या दगडाची खाणीमध्ये काम करीत असताना अचानक जुन्या ब्लास्टिंगचा स्फोट झाला. काकासाहेब आत्माराम कटारे यांची वलखेडा शिवारात स्ट्रोन केशर आहे. तिथे त्यांच्याकडे काम करणारे रविंद्र धोत्रे रा.संगमजळगाव ता.गेवराई जि.बीड हे आपल्या पत्नी तसेच दोन मुलांसोबत सुमारे दोन महिन्यापासून दगडाच्या खाणीतून दगड ट्रॅक्टरव्दारे खडी मशिनसाठी नेण्याचे काम करत होते.
आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास धोत्रे पती-पत्नी हे खदानीवर दगड फोडण्याचे काम करीत होते. तेव्हा त्याचे दोन मुले नामे शुभम धोत्रे (8) आणि शिवराज धोत्रे (6) हे उन्हामुळे खाणीला खेटून सावलीत बसलेले असताना अचानक जुन्या ब्लास्टिंगच्या तोट्याचा अचानक स्फोट झाला. यानंतर ही दोन बालके दहा फुटाच्या अंतरावर उडून पडली. या स्फोटात उडालेल्या दगडांचा मार लागल्याने या मुलांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा धोत्रे पती-पत्नी हे त्याच खाणीत ट्रॅक्टरच्या दुसऱ्या बाजूला दगड भरण्याचे काम करीत असल्यामुळे वाचले. याप्रकरणी अंबड पोलिसात चंद्रकांत लाड यांच्या माहितीवरुन आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जालन्यात दगडाच्या खाणीत स्फोट, दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2019 11:13 PM (IST)
गावातील वलखेडा शिवारात गट क्रमांक 22 मध्ये दगडाची खदान आहे. या खाणीत धोत्रे कुटुंब दगड फोडण्याचे काम करत होते. दुपारच्या वेळी मयत मुले खाणीजवळ खेळत असताना जुन्या खाणीत लावलेल्या स्फोटकाचा अचानक स्फोट झाला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -