Jalgaon Train Accident : जळगाव जिल्ह्यात पुष्पक एक्स्प्रेसला (Pushpak Train Accident) मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्यानं काही प्रवाशांनी रेल्वेखाली उडी घेतली. त्याच वेळी अनेक प्रवासी समोरून येणाऱ्या बंगळुरू रेल्वेखाली गेल्यानं अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर वेगाने बचावकार्य करण्यात येत असून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण 10 ते 12 जणांचा मृ्त्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तर या दुर्घटनेत एकूण 40 जण जखमी झाले आहेत.
गिरीश महाजन घटनास्थळी रवाना
या दुर्घटनेबाबत माहिती देणार फोन मला आला. त्यानंतर सर्व कामे सोडून मी जळगाजळगाव :वला निघालो आहे. अगदी दोन ते तीन मिनिटांत मी घटनास्थळावर पोहोचणार आहे. तत्पुर्वी 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. घटनास्थळावर गेल्यानंतरच मला तिथं नेमकं काय घडलं, हे समजू शकेल, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
डॉक्टरांची टीम पोहोचली, बचावकार्य चालू
ही घटना अतिशय दुर्घटना आहे. समोरून गाडी येत होती आणि लोकांनी उडी मारल्यामुळे लोक या गाडी खाली आले, असं सांगितलं जात आहे. पण नेमकं काय घडलंय, हे तिथं गेल्यावरच समजेल. आमचे कार्यकर्ते आता घटनास्थळी गेले आहेत. या दुर्घटनेच्या ठिकाणी पाचोरा हे ठिकाण जवळ आहे. त्यामुळे जखमींना याच भागातील रुग्णालयाच नेण्याचं काम चालू आहे. डॉक्टरांची टीम तिथे आलेली आहे. चार ते पाच लोकांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
फडणवीसांनी व्यक्त केलं दु:ख
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दु:ख व्यक्त केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
आठ रुग्णवाहिका रवाना
तसेच, माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपात्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा :