जळगाव : उपजिल्हाधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. समाधान जगताप असं या बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे. आरोपीनं एका प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना संशय आला आणि समाधानचं बिंग फुटलं.
जळगावच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता विभागात आलेल्या पती-पत्नीच्या वादात पोलिसांनी पतीवर कारवाई करावी अशी मागणी समाधानने केली होती. यासाठी समाधाननं पोलिसांवर दबावही आणला होता. मात्र उपजिल्हाधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या समाधानचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटलं. उलटतपासणी करताना समाधानचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान समाधानने अशाच प्रकारे शासकीय अधिकारी असल्याचं सांगत राज्यभरात अनेकांची फसवणूक केली. त्याला मदत करणाऱ्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उपजिल्हाधिकारी असल्याचा बनाव, जळगावात तरुणाला अटक
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
22 Jul 2017 09:09 PM (IST)
उपजिल्हाधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. समाधान जगताप असं या बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे. आरोपीनं एका प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना संशय आला आणि समाधानचं बिंग फुटलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -