पुणे : महाराष्ट्राच्या शिक्षण मंडळाकडून अकरावी आणि बारावीच्या विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुप बदलण्याचा विचार सुरु आहे. त्यादृष्टीनं आराखडा बनवायचं कामही सुरु करण्यात आलं आहे. जेईई आणि नीटसारख्या परीक्षांच्या धर्तीवर हे बदल करण्याचा बोर्डाचा मानस आहे.


नव्या आराखड्यानुसार भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांचे 100 गुणांपैकी 70 गुण लेखी परीक्षेसाठी तर 30 गुण प्रात्यक्षिक परीक्षा अर्थातच प्रॅक्टिकलसाठी देण्यात येतील. गणित विषयासाठी 80 गुणांची लेखी परीक्षा तर 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल.

राज्यातले विद्यार्थी जेईई आणि नीटसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी तयार व्हावेत यासाठी हे बदल करणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.