जळगाव : जळगाव महापालिकेचा निवडणूक निकाल 2018 आज जाहीर झाला आहे. तब्बल 40 वर्षानंतर जळगाव महापालिकेतील सुरेश जैन गटाचं वर्चस्व संपलं आहे. भाजपने जळगाव महापालिकेच्या 75 पैकी 57 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेला 15 आणि एमआयएमला 3 जागांवरच यश मिळवता आलं आहे.


मूलभूत सोयीसुविधांचा अभाव हे सत्तापालटाचं एक प्रमुख कारण समजलं जात आहे. दरम्यान, पराभव मान्य असून आत्मचिंतन करु, अशी प्रतिक्रिया सुरेश जैन यांनी दिली आहे. तर भाजपच्या विकासाच्या मॉडेलला मत मिळाल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

LIVE UPDATE




  • जळगाव निवडणूक निकाल : 75 जागांचे कल हाती, भाजप 57 जागांवर पुढे तर शिवसेना 14 आणि इतर 4 जागी आघाडीवर

  • जळगाव निवडणूक निकाल : भाजप 34, शिवसेना 23 आणि इतर एका जागी आघाडीवर

  • भाजपला 30, शिवसेनेला 22 जागांवर आघाडी

  • भाजप 11, शिवसेना 7 जागी आघाडीवर

  • भाजपला 7, शिवसेनेला 6 जागांवर आघाडी

  • जळगाव निवडणूक निकाल : भाजप 3, शिवसेना 6 जागा

  • अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नसल्याने मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांची निदर्शनं

  • भाजप 3 आणि शिवसेनेला दोन जागांवर आघाडी

  • पहिले कल हाती, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागांवर आघाडी

  • पोस्टल मतमोजणीला सुरुवात, पहिले कल काही क्षणात हाती


जळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. वर्षभरात होणाऱ्या निवडणुका आणि सध्या महाराष्ट्रात चर्चेत असणारा मराठा मोर्चा, यांचं प्रतिबिंब निकालावर पडतं? की फक्त स्थानिक मुद्दे आणि स्थानिक राजकारण या निवडणुकीवर प्रभाव पाडेल, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त
सकाळी दहा वाजता टपाल मतांच्या मोजणीनंतर इतर मतमोजणी सुरु होईल. सहा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रकिया पार पडेल. प्रत्येक प्रभागाला 2 असे 38 टेबल ठेवण्यात येणार आहेत. तसंच मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

55 टक्के मतदान
जळगाव महापालिकेसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान झालं. 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी 303 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झालं. पहिल्या सत्रात संथ प्रतिसाद देणाऱ्या जळगावकरांनी शेवटच्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे जळगावात 55 टक्के मतदान झालं.

भाजप-शिवसेनेत मुख्य लढत
यंदाच्या निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व 75 जागा लढवणार आहे. तर शिवसेना 70 जागा लढवणार आहे. त्यामुळे इथे खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच होणार असल्याचं दिसतं. मात्र त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव महापालिका
एकूण प्रभाग - 19
जागा - 75
उमेदवार - 303
मतदार - 3 लाख 65 हजार 72
मतदान केंद्रे  - 469

जळगाव मनपा निवडणुकीतील प्रमुख लढती
प्रभाग 5 अ
1-विष्णू भंगाळे [माजी महापौर ,विद्यमान शिवसेना]
2-सुनील माळी [भाजप]
3-हेमेंद्र महाजन [राष्ट्रवादी]

प्रभाग 5 ब
1-राखी सोनावणे [माजी महापौर, शिवसेना]
2-जहाँ पठाण [भाजप]
3-मंगल देवरे [राष्ट्रवादी]

प्रभाग 5 ड  
1-नितीन लड्ढा [माजी महापौर, शिवसेना]
2-अनिल पगारिया [भाजप]

प्रभाग 7 अ
1-सीमा भोळे [भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी]
2-साधना श्रीमाळ [शिवसेना]

प्रभाग 11 अ
1-शामकांत बळीराम सोनावणे [शिवसेना]
2-पार्वता बाई भिल [भाजपा]
3-सायरा तडवी [ राष्ट्रवादी]

प्रभाग 11 क
1-सिंधुताई कोल्हे [माजी महापौर ,भाजपा उमेदवार]
2-कमल म्हस्के [अपक्ष]
3-नीता सांगोले [अपक्ष]
4-अनिता सोनावणे [अपक्ष]

प्रभाग 11 ड
1-ललित कोल्हे [विद्यमान महापौर, भाजप उमेदवार]
2-बुधा पाटील [शिवसेना]
3-शिवराम पाटील [काँग्रेस]
4-किशोर माळी [अपक्ष]

प्रभाग 15 अ
1-सुनील महाजन [माजी उपमहापौर, शिवसेना]
2-मेहमूद बागवान [भाजप]
3-जाकीर बागवान [काँग्रेस]

प्रभाग 19 अ
1-लता चंद्रकांत सोनावणे [शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी]
2-सारेफा रहमान तडवी [भाजपा उमेदवार]