Gulabrao Patil : बीकेसीवर झालेल्या मेळाव्याला असलेली गर्दी, आमदार, खासदार तसेच पदाधिकाऱ्यांची शिंदे गटाकडे असलेली संख्या असं गणित मांडत, धनुष्यबाण आमचाच असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. चिन्ह आमचंच हे सांगत, दसरा मेळाव्याची संख्या जास्त होती, आमदारांची संख्या जास्त आहे, खासदारांची आणि लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. त्याबरोबरच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे धनुष्यबाण आमचाच असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. 


मुंबईत पार पडलेल्या दसरा मेळाव्यात गर्दी ही उध्दव ठाकरेंच्या मेळाव्याला सर्वात जास्त होती की एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला जास्त होती, अशी चर्चा सुरु आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गर्दी किती होती हे सांगण्यापेक्षा सर्वांनाच माहित आहे, कोणत्या मैदानाची किती मर्यादा आहे, हे सर्वांनाच माहित आहे.  ग्रामीण भागातून शहरी भागातून अशा आलेल्या लोकांची गर्दी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात दुप्पट होती असे, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. 


एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात जी गर्दी होती,  यावरुनच आम्ही शिवसेना वाचविण्याचा निर्णय, भगवा झेंडा वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. तो लोकांनी मान्य केला आहे, त्यामुळे दसरा मेळाव्याच सर्व सोनं लुटून घरी आले आहेत, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट करत दुसरीकडे गद्दार म्हणणाऱ्या उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे.


नुसतंच उलटच बोलयाचं...अभिनंदन पण कर बाबा...अंबादास दानवेचा घेतला समाचार
दिवाळी फुड प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे, यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रतुत्तर दिले आहे. ते विरोधक असून त्यांच काम विरोध करण्याचे आहेच, मात्र १०० रुपयात लोकांना चार वस्तू मिळताहेत, त्या योजनेचे अभिनंदन कर बाबा, नंतर बाकीच्या गोष्टी बोल, असा एकेरी शब्दात उल्लेख मंत्री गुलाबराव पाटील यांना अंबादास दानवे यांचा समाचार घेतला आहे. अभिनंदन करत दर जास्त आहे, त्याची चौकशी केली पाहिजे असं म्हटल, अभिनंदन पण केलं पाहिजे ना, पण नुसतच उलटंच बोलायचं, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी अंबादास दानवे यांना लगावला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Gulabarao Patil : राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये, उद्या आदित्य ठाकरेंना मुल होईल : मंत्री गुलाबराव पाटील 


Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : धनुष्यबाण चिन्हासाठी दोन्ही गटात सामना, चिन्हाचं काय होणार?