जळगाव : जळगावातील मुंदडा दाम्पत्याने सहा वर्षांच्या लेकाच्या मरणाचं दुःख बाजुला सारुन त्याचं नेत्रदान केलं आहे. कठीण प्रसंगातही सामाजिक भान जपून आदर्श उदाहरण त्यांनी समोर ठेवलं आहे.


जळगावच्या भुषण मुंदडा यांचा 6 वर्षांचा मुलगा चिरागचं शुक्रवारी आकस्मिक निधन झालं. त्यानंतर मयत चिरागचे नेत्रदान करण्याचा निर्णय मुंदडा परिवाराने घेतला. सुनील जोशी व गिरीश झवर यांनी योग्य ती कार्यवाही करुन नेत्रदानाचे काम वेळेत पूर्ण केले.

इतक्या कमी वयात नेत्रदान केल्याच्या घटना फारच क्वचित ऐकायला मिळतात. भारतातील अंधांची संख्या लक्षात घेता नेत्रदानाचे आदर्श कार्य मुंदडांनी केलं. इतरांनीही नेत्रदानासाठी प्रवृत्त व्हावं, असं आवाहन नेत्रपेढीच्या तज्ञ नेत्रविशारदांनी केले आहे.