एकनाथ खडसेंचा व्यासपीठावर शरद पवारांना वाकून नमस्कार
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 01 Apr 2018 10:08 AM (IST)
एकनाथ खडसेंच्या या कृतीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात झालेल्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना व्यासपीठावरच वाकून नमस्कार केला. खडसेंच्या या कृतीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगावात अनेक विकासकामांची उद्घाटनं होणार होती. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत या कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळले.