नोटा बदली प्रकरणाची चौकशी थेट जळगाव जिल्हा परिषदेच्या दारात
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 25 Mar 2017 05:59 PM (IST)
जळगाव : नोटाबंदीच्या काळात जळगावातील जिल्हा सहकारी बँकेच्या चोपडा शाखेतील नोटा बदलीप्रकरणाची चौकशी आता थेट जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचली आहे. आता या प्रकरणी थेट जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात आली. नोटाबंदीच्या काळात 72 लाखांच्या जुन्या नोटा बदलण्यावरुन सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी संचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांची सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात आली. काल रात्री वाणी यांच्या घरी आणि कार्यालयातही ही चौकशी सुरुच होती. विशेष म्हणजे, हे पथक जळगावातच ठाण मांडून बसलं आहे. त्यामुळं आखणी कुणाची चौकशी होणार याकडे जिल्हाचं लक्ष लागलं आहे.