Pune Jain Boarding House : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding House) जमिनीच्या व्यवहारावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर एकामागून एक आरोप केले जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मादी आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) हे मोहळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज मंत्री मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग होस्टेलमध्ये गेले होते. त्यांनी जैन गुरुचं दर्शन घेऊन चर्चा केली आहे. यानंतर मोहोळ यांना जैन समुदायाच्या नागरिकांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळालं. जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी नागरिांनी मोहोळ यांच्याकडे केली आहे.
जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा हीच आमची मागणी
आमचा अधिकार काढून घेतला जातोय म्हणून आम्ही आंदोलन करत असल्याची माहिती मगामुनी जैन यांनी दिली आहे. आम्ही मंत्री मुरलीधर मोहोळ यांना बोलवले होते. अजित पवारांनांही बोलवले होते. मोहोळ यांचा यामध्ये काही हस्तक्षेप नाही असं त्यांनी सांगितले आहे. मोहोळ यांनी काही वेळ मागितला आहे आम्ही तो सोडवू असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. हा व्यवहार रद्द झाला पाहिजे आम्ही त्यांना सांगितल्याची माहिती महामुनी जैन यांनी दिली आहे. 1 तारखेच्या आत हे व्हायला हवे नाहीतर आम्ही जीव सोडू असेही महामुनी जैन म्हणाले. आम्ही शांत बसणार नाही. मोहोळ यांनी आम्हाला सांगितले आहे की हा व्यवहार रद्द करु. मी तुमच्याबरोबर आहे हे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. आमच्यावर अन्याय होणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे. समाज एक राहील ही भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली आहे. आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना बोलावलं आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील एचएनडी जैन बोर्डिंगची जागा 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी सार्वजनिक ट्रस्टद्वारे मुलांसाठी वसतिगृह आणि धर्मशाळेकरीता त्यांनी ही जागा दान दिली होती. शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी याचा चांगला फायदा होत आला आहे. गेल्या पन्नास वर्षात या वसतीगृहाचा दहा हजारपेक्षा जास्त मुलांनी लाभ घेतला आहे. आता या जमिनीच्या विक्रीवरून वाद निर्माण झाला आहे. एचएनडी जैन बोर्डिंगची संपूर्ण तीन एकर जागा गहाण ठेवण्यात आलेली असून या जागेत असलेले 1008 श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर देखील आता गहाण आहे. शिवाय, 70 कोटी रुपयांच्या कर्जापोटी संपूर्ण जागेवर आता बँकेचा बोजा चढविण्यात आला असल्याचीही माहिती आहे. सार्वजनिक मालमत्ता असलेली ही जागा काही विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला विकल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कंपनीत खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचाही बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
एकीकडे मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंग होस्टेलमध्ये दाखल, दुसरीकडे भाजपची धंगेकरांविरोधात पत्रकार परिषद