Indurikar Maharaj New Video: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावरुन त्यांच्यावर मोठ्या टीका देखील झाल्या, दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असं म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या. या टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना (Indurikar Maharaj) मोठा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं दिसून आले. त्यानंतर आता इंदुरीकर महाराजांचा आणखी एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

इंदुरीकर महाराज यांच्या कन्येच्या नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याच्या निमित्ताने महाराजांवर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे ते अत्यंत व्यथित झाले. विशेषतः मुलीच्या पेहरावावरून आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या होत्या. या टीकेमुळे कंटाळलेल्या इंदुरीकर महाराजांनी थेट कीर्तनसेवा थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले असताना आता 10 नोव्हेंबर रोजीचा बदगी येथील कीर्तनातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराजांनी लग्न जोरात करणार...काय बोंबलायचंय बोंबला असं म्हटलं आहे. तसेच एकीकडे 30 मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटीचा खर्च होतो, तेव्हा कोणत्याही चँनेलवाल्यांनी राजकारण्यांना पैसे कुठून आणले विचारुन दाखवावं, असंही इंदुरीकर महाराज बोलताना दिसत आहेत. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय? (Indurikar Maharaj)

इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याचं आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आलं होतं. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरला. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल  होत आहेत. या समारंभाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. मात्र या साखरपुड्यावरुन सोशल मीडियावरुन अनेकांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर निशाणा साधला होता. 

इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? (Who is the son in law of Indurikar Maharaj?)

मिळालेल्या माहितीनूसार, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. इंदुरीकर महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही लोकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.

संबंधित बातमी:

Indurikar Maharaj : मला घोडे लावा, माझ्या मुलीचा काय दोष, तिच्या कपड्यावर कशाला बोलता? ट्रोलिंगने हैराण झालेल्या इंदुरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय?