Devendra Fadnavis on Indrayani River Bridge Collapses : इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकूण अतिशय दुःख झाले. यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, या दुर्घटनेत 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
काहीजण वाहून गेल्याची भीती आहे. त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नेमकी कशी घडली घटना?
पूल कोसळल्याची घटना नेमकी कशी घडली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, आमचा 25 ते 30 जणांचा समूह पुलावर होता. एकाच ठिकाणी काही वेळ आम्ही सर्वजण थांबलो होतो. आम्ही पुलावर असतानाच काही कळायच्या आतच पूल कोसळल्याने बरेच जण खाली पडले. त्यातील काही लोक लगेच नदीच्या काठावर आले. परंतु काही लोक पाण्यात पडून बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. वाहून गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या: