Pratap Sarnaik : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असं सूचक वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केलं आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत प्रताप सरनाईकांनी दिले आहेत. त्यामुळं आता धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे कोण कोणते नेते शिवसेनेच्या गळाला लागणार? असा सवाल उस्थित केला जात आहे.
नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक?
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मात्र, या बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होत आहे असे सरनाईक म्हणाले. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जननेते दाखवून दिलं आहे की, खरी शिवसेना कोणाची आहे. बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे जात आहे हे जनतेने दाखवले आहे. 80 जागा लढवून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याचे सरनाईक म्हणाले. यामुळं सर्वसामान्य जनतेने खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिलं आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्या तदेखील काही बदल झाला तर तुम्हाला वेगलं काही वाटायला नको असेही प्रताप सरनाईक म्हणाले. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, तानाजी सावंतांच्या नाराजीवर सरनाईकांचं वक्तव्य
राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते आदलाबदल होत असते असे म्हणत तानाजी सावंत यांच्या नाराजीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केलं. पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर होते. नाराजीबाबत आपल्याशी बोलणं झालं नसल्याचं सरनाईकांनी सांगितलं आहे. पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांचा पहिला निर्णय आरोग्य विभागाचा घेतला आहे. तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार असल्याचे सरनाईक म्हणाले. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाचा घेतल्याने मोठी चर्चा सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सरनाईकांनी स्पष्ट केलं आहे.
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा एक खासदार आणि दोन आमदार
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा एक खासदार आणि दोन आमदार आहे. यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील तसेच आमदार प्रवीण स्वामी हे ठाकरे गटाचे प्रतिनिधी आहेत. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. तर उमरगा मतदारसंघातून ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी हे विजयी झाले होते. त्यांनी ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या: