Vande Bharat: देशातील सर्वात जास्त लांब पल्याची वंदे भारत महाराष्ट्राला मिळाली आहे... उपराजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत 881 किलोमीटरचा अंतर कापेल... त्यामुळे महाराष्ट्रातील एका मोठ्या भागासाठी दर्जेदार रेल्वे प्रवासाची सोय या वंदे भारत च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.. विशेष म्हणजे या वंदे भारतला महाराष्ट्रातील अत्यंत प्रमुख तीर्थक्षेत्र शेगाव मध्ये ही थांबा देण्यात आल्यामुळे नागपूर आणि पुण्यातून शेगावला जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी ही वंदे भारत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे

Continues below advertisement

अजनी पुणे दरम्यानच्या पण ते भारतचे खास वैशिष्ट्ये

* अजनी ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत ट्रेन महाराष्ट्र साठी मिळालेली 12 वी वंदे  भारत आहे..

* वर्धा ते मनमाड दरम्यानच्या महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागासाठी अद्यापही वंदे भारत सेवा नव्हती * या वंदे भारताच्या माध्यमातून वर्धा, अकोला, शेगाव- भुसावळ, जळगाव, मनमाड, पुनतांबा-दौंड या मार्गावर म्हणजेच महाराष्ट्राच्या अत्यंत मोठ्या भूभागाला वंदे भारत सारखी दर्जेदार रेल सेवा उपलब्ध झाली आहे... 

Continues below advertisement

* अजनी - पुणे दरम्यानची वंदे भारत एक्सप्रेस 881 किलोमीटर चे अंतर कापणार.. 

* त्यामुळे ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आहे..* वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये:- * पूर्ण वातानुकूलित कोच, ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण..* आरामदायी एर्गोनॉमिक सीट्स, LED एंबियंट लाइटिंग* मोठी पॅनोरमिक खिडक्या* बायो-वॅक्यूम शौचालये* अग्निसुरक्षा प्रणाली, CCTV देखरेख, इंटरकॉम सुविधा* रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली (30% ऊर्जा बचत)* ड्युअल सस्पेंशन सिस्टम – उच्च वेगावरही आरामदायी प्रवास

कसा असेल या नव्या वंदे भारतचा वेळापत्रक

* अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस (सोमवार वगळता) धावेल* अजनी वरून सकाळी 09:50 वाजता सुटणारी वंदे भारत त्याच दिवशी रात्री 21:50 वाजता पुणे येथे पोहोचेल..* पुणे ते अजनी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस (मंगळवार वगळता) धावेल..* पुण्यातून सकाळी 06:25 वाजता सुटून वंदे भारत त्याच दिवशी संध्याकाळी 18:25 वाजता अजनी येथे पोहोचेल..* वंदे भारत मध्ये एकूण 8 कोच असतील त्यात 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार तर 7 चेअर कार कोच असतील.. * 590 प्रवासी प्रवास करू शकतील

मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत तयार झालेली ही वंदे भारत आधुनिक तंत्रज्ञान व आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे...