नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील चोवीस तासांत 40,953 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 188 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 23,653 लोकं बरे होऊन घरी गेले आहेत. याआधी 28 नोव्हेंबर 2020 ला 41,810 कोरोना रुग्ण सापडले होते. 


देशात आतापर्यंत एक कोटी 15 लाख 55 हजार 284 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एक लाख 59 हजार 558 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तेच एक कोटी 11 लाख 7 हजार 332  लोकं कोरोनावर मात करत बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली असून ती 2 लाख 88 हजार 394 झालेली आहे. 


महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 25,681 नविन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 70 पेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 21,89,965 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर 1,77,560 रुग्ण कोरोनाबाधित झालेले आहेत. काल दिवसभरात मुंबईत 3,062 नविन रुग्णांची नोंद झाली होती तर आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3,55,897 वर पोहोचली आहे.


चार कोटीपेक्षा जास्त लोकांनी घेतली लस
देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली होती. कालपर्यंत देशात 4 कोटी 20 लाख 63 हजार 392 लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. 
देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.38 टक्के आहे. तेच बरे होण्याचा रेट जवळजवळ 96 टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा रेट पकडून 2.36 टक्के आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण मिळण्यात भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. 19 मार्चपर्यंत देशभरात 23 कोटी 23 लाख कोरोनाची टेस्ट केलेल्या लोकांची संख्या आहे. यापैकी 10 लाख लोकांची काल टेस्ट करण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचा रेट 3 टक्के आहे. 


काही राज्यांत कोरोनाने एकही मृत्यू नाही
कोरोनाने सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत. तर अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, दादरा नगर हवेली, लडाख, लक्षद्वीप, मिजोरम, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा या राज्यांत आतापर्यंत कोरोनाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. 


कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कोरोनाबाधित रुग्ण सापडत असलेला देश आहे. रुग्ण बरे होण्यात जगात अमिरिकेनंतर भारताचा नंबर लागतो. तर मृत्यू होणाऱ्यांमध्ये अमेरिका, ब्राझिल आणि मॅक्सिकोनंतर भारताचा नंबर लागतो.