बारामती : बारामतीतील दशरथ जाधव यांनी वयाच्या 64व्या वर्षी आर्यन मॅन स्पर्धा पूर्ण केलीये. जर्मनी येथे झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत बारामतीतील दशरथ जाधव यांनी बाजी मारली आहे. वयाच्या 64 व्या वर्षी आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केल्यानं दशरथ जाधव यांचं सर्वत्र कौतुक होतंय. जाधव यांनी वयाच्या 64 व्या वर्षी आर्यन मॅन स्पर्धा पार केली आहे. गेली 4 वर्ष सलग दशरथ जाधव हे या स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि ती पूर्ण करीत आहेत. मूळचे बारामती तालुक्यातील झारगड वाडी गावातील दशरथ जाधव हे सध्या पुण्यात स्थायिक आहेत. आयर्न मॅन 16 तासांची ही स्पर्धा त्यांनी 14 तास 12 मिनिटांत पूर्ण केली आहे. तरुणांपुढे एक आदर्श ठेवला आहे. फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉरपोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित एक लांब-अंतर ट्रायथलॉन रेस आहे, यात 4 किमी पोहणं 180.2 किमी सायकल चालवणं आणि 42.20 किमी धावणं समाविष्ट आहे. त्या क्रमाने आणि ब्रेकशिवाय हे सगळं करायचं असते. हे सगळं दशरथ जाधव यांनी वायच्या 64 व्या वर्षी 14 तास 12 मिनिटांमध्ये पूर्ण केलं.


दशरथ जाधव यांना व्यायामाची गोडी कशी लागली? 


वाढत्या वयासोबत सोबत येणाऱ्या व्याधी देखील दशरथ जाधवांना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी व्यायामला सुरुवात केली. सुरवातीला जिम मग परत रनिंग आणि सायकलिंग सुरु केलं. सुरुवातीला ते छोट्या छोट्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे. कालांतराने त्यांना आर्यन मॅन स्पर्धेबद्दल माहिती मिळाली मग त्यांनी आर्यन मॅनची तयारी सुरु केली. आज देखील दररोज 3 ते 4 तास व्यायाम दशरथ जाधव करतात.




किती आर्यन मॅन स्पर्धेत सहभागी झालेत? 


मलेशियात 2017 साली झालेल्या फुल आर्यन मॅन स्पर्धेत दशरथ जाधव सहभागी झाले. त्यानंतर दुसऱ्यांदा जर्मनीत  2018 साली स्पर्धा झाली त्यातही ते सहभागी झाले. त्यांनंतर तिसरी फुल आयर्न मॅन ऑस्ट्रिया 2019 मध्ये झाली आणि चौथी आणि शेवटची जर्मनी 2021मध्ये ते सहभागी झाले होते. 2017 च्या आधी दशरथ जाधव यांनी 2 वेळा हाफ आर्यन मॅन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.


आर्यन मॅन ही स्पर्धा कशी असते? 


फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉरपोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित एक लांब-अंतर ट्रायथलॉन रेस आहे, यात 4 किमी पोहणे 180.2 किमी सायकल चालवणे आणि 42.20 किमी धावणे समाविष्ट आहे. त्या क्रमाने हे सगळं 16 तासाच्या आत पूर्ण करायचं असते. हे सगळं करताना आपल्या स्वतः फिट राहणं गरजेचं असत. त्याशिवाय हे पूर्ण कारण अशक्यच असत. या स्पर्धेत जगभरातील मॅरेथॉन पट्टू सहभागी होत असतात. हे सगळं दशरथ जाधव यांनी वायच्या 64 व्या वर्षी 14 तास 12 मिनिटात पूर्ण केली. 




पुढे कोणत्या स्पर्धेत दशरथ जाधव सहभागी होणार आहेत? 


फेब्रुवारी 2022 मध्ये अमेरिकेततील फ्लोरिडा येथे होणाऱ्या आल्ट्रा आर्यन मॅन स्पर्धेत दशरथ जाधव यांची निवड झालीय आहे.. अल्ट्रा आयर्न मॅन स्पर्धा ही 36 तासांची असते. ही जगातील टॉप स्पर्धेपैकी एक स्पर्धा मानली जाते.  ज्यात 10 किलोमीटर पोहणे, 425 सायकलिंग आणि 84 km रानींग हे सगळं 36 तासांत पार करायचं असतं. त्यानंतर लंडन इडनबर्ग लंडनमध्ये ऑगस्ट मध्ये होणाऱ्या स्पर्धेत देखील दशरथ जाधवाची निवड झाली आहे. ज्यात 130 तासात 1500 km सायकलिंग करावी लागते.


दशरथ जाधव यांची ओळख? 


मूळचे बारामती तालुक्यातील झारगरवाडी गावचे रहिवासी आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे बारामतीत झालं त्यांनंतर पुण्यात त्यांनी आयटीआय केला. आयटी आय केल्यानंतर सुरुवातीला काळात त्यांनी खाजगी कंपनीत काम केलं. त्यानंतर त्यांनी 1984 साली फैब्रिकेशन, 1988 साली सिमेंट आणि 1990 सलापासून ते स्टीलचा व्यवसाय करीत आहेत.. आज एक उत्तम उद्योजक म्हणून त्यांचा नावलौकिक कमावला आहे. व्यवसायसोबतच दशरथ जाधवांनी आपली व्यायामाची गोडी जपतात. व्यवसाय आणि व्यायामाची सांगड अगदी योग्य पद्धतीने जाधव यांनी घातली आहे.


वयाच्या 64 व्या वर्षी दशरथ जाधवांनी आयर्न मॅन स्पर्धा पार केलीये. 2022 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या अल्ट्रा आयर्न मॅन स्पर्धेत देखील दशरथ जाधव सहभागी होणार आहेत. या वयातही तरुणांना लाजवतील असा उत्साह दशरथ जाधवांमध्ये आहे. त्यांना पुढील वाटचालीस एबीपी माझाच्या शुभेच्छा!