Independence Day 2024 Maharashtra Live Updates : आज देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, महत्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Independence Day 2024 Maharashtra Live Updates : आज देशभर स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. आज दिवसभरात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रिडाविषयक घडामोडींचा आढावा.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Aug 2024 11:16 AM
शाळेला जायला रस्ता नाही, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच विद्यार्थ्यांचं उपोषण सुरु

शाळेला जायला रस्ता नाही, म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच विद्यार्थ्यांनी उपोषण सुरु सुरू केलं आहे. छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तहसील कार्यालयात विद्यार्थीच उपोषणाला बसले आहेत. कन्नड - आडगाव - बोलठाण ग्रामीण मार्ग 173 च्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यलयात पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यलयात पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल व इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित आहेत.

पुण्यात राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा 

पुण्यात राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा 


स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा 


पुण्यातील विधान भवनात पार पडणार राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण


ध्वजारोहणाला पुण्याचे विभागीय आयुक्त चद्रकांत पुलकुंडवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची देखील उपस्थित 

आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते महाडमधील बिरवाडीमध्ये ध्वजारोहण

 


शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी  आज 78 वा स्वातंत्र्य दिवसाला महाड तालुक्यांतील ग्रामपंचायत नडगाव तर्फे बिरवाडीमध्ये हजेरी लावली यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये केलं ध्वजारोहण

राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी बारामतीत ध्वजारोहण केलं. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे सुनेत्रा पवारांनी ध्वजारोहण केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायले. तसेच सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शपथदेखील देण्यात आली..

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर रंगले तिरंग्याच्या रंगात

Independence Day 2024 : आज देशभर स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा होत आहे. अशातच आज विठुरायाची राउळी तिरंग्याच्या रंगात रंगून गेली आहे. आज मंदिर समितीने विठ्ठल मंदिरास तीन रंगांच्या (तिरंगा) फुलांची आकर्षक आरास केली असून विठुरायाही या स्वातंत्र्याच्या रंगात रंगून गेला आहे. आज विठ्ठल मंदिराला पांढऱ्या तांबड्या आणि हिरव्या रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलं आहे. विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार सोळखांबी , नामदेव महाद्वार अशा विविध ठिकाणी या तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे .

पार्श्वभूमी

Independence Day 2024 Maharashtra Live Updates  :   आज देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रिडाविषयक घडामोडींचा आढावा. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.