मुंबई : राज्यात सध्या पालकमंत्री पदावरून (Guardian Minister) मागील 2 दिवस चांगलाच वाद रंगल्याच पाहायला मिळालं होतं. गुरुवारी पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. छगन भुजबळ आणि दादा भुसे यांना नाशिक जिल्ह्याच्या ध्वजारोहणाची संधी हवी होती तर, अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असल्याने पुणे येथे ध्वजारोहनासाठी इच्छुक होते. 


पालकमंत्री पदाचा वाद


रायगडला अदिती तटकरे तर कोल्हापूरला हसन मुश्रीफ इच्छुक होते. परंतु यातील कोणत्याही मंत्र्याला मनासारखे जिल्हे न मिळाल्यामुळे नाराज असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत अधिक माहिती घेतली असता संबंधित मंत्र्यांकडून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री पद अपेक्षित असल्यामुळे ध्वजारोहणाची संधी मिळाल्यास या माध्यमातून जिल्ह्यात एक चांगला संदेश जाण्याचा प्रयत्न करता आला असता आणि यासाठीच आपापल्या जिल्ह्यांवर ध्वजारोहनासाठी दावा सांगण्याचा प्रयत्न संबंधित मंत्र्यांकडून झाल्याचे पाहायला मिळालं. 


कोणते नेते कुठे ध्वजारोहण करणार?


दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करण्यात आल्यामुळे मंत्र्यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी ध्वजारोहणासाठी ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे, तिथं जाणार असल्याचा जाहीर केला आहे. अजित पवार कोल्हापूर तर, छगन भुजबळ अमरावतीला ध्वजारोहणासाठी जाणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच शिंदे-फडणवीसांना नव्याने सहभागी झालेल्या पवार गटाला शांत करण्यात यश आल्याचा पाहायला मिळत आहे. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये केवळ रायगड जिल्ह्यासाठी बदल करण्यात आला आहे.


चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये ध्वजारोहण करणार होते, परंतु त्या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार असल्यामुळे आता चंद्रकांत पाटील हे रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणासाठी उपस्थित राहणार आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सातत्याने शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दावा केला होता तर, दुसरीकडे तटकरे कुटुंबीयांनी पालकमंत्री पद पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आगामी काळात शिंदे आणि पवारांमध्ये वाद होण्याची शक्यता लक्षात घेत आदिती तटकरे या जिल्ह्याच्या मंत्री असताना देखील या ठिकाणी ध्वजारोहणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं परंतु आता यात बदल करून चंद्रकांत पाटील या ठिकाणी ध्वजारोहणासाठी उपस्थित असणार आहेत. 


ध्वजारोहनासाठी राष्ट्रवादीचे मंत्री कुठं असतील?