Sangli Krishna River News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सांगली (Sangli)  जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळं पुन्हा एकदा कृष्णा नदीनं (Krishna River) इशारा पातळी ओलांडली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पातळी 41 फुटांजवळ गेली आहे. तर दुसरीकडे कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. यामुळं कृष्णा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


कोयनेतून वाढवलेला विसर्ग आणि सांगली जिल्ह्यात होत असलेला पाऊस यामुळं पुन्हा कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातत्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार होताना दिसत आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळं नागरिकांना सतर्क करण्यात आलं असून, प्रशासन देखील अलर्ट झालं आहे.


आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा


आज राज्यात कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  


राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाला आहे. संपुर्ण राज्यात चांगला पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पुण्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, लष्कराची तुकडी सांगलीत दाखल