Sangli Rain News:  राज्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं कृष्णा आणि वारणा नद्यांच्या (Krishna Reiver and Varana river) पाणी पातळीत सतत वाढ होत आहे.  दोन्ही नद्या आता पात्राबाहेर पडल्या आहेत. कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून (Almatti dam) विसर्ग वाढवत तो  65 हजार क्युसेक्सवरुन विसर्ग आता 1 लाख क्युसेक्स करण्यात आला आहे. कृष्णा नदी पात्र परिसरात संततधार सुरु असल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


कृष्णा नदीची पाणीपातळी 17 फुटांवर 


सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर आहे. दरम्यान, शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये गेली तीन-चार दिवस सततधार पावसाची सुरुवात आहे.  या परिसरातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.  यामुळे या वारणा नदीवरील बरेच बंधारे पाण्याखाली गेले असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. काही ठिकाणी वारणा नदी पात्रा बाहेर पडल्याने नदीकाठच्या पिकांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. सध्या चांदोली धरण 64.27 टक्के टक्के भरले असून 1592 क्युसेकने पाणी वारणा नदी पात्रात सोडले जात आहे.


महत्वाच्या बातम्या:


आज राज्यात कसं असेल हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा अंदाज