तुळजापूर: शिर्डीप्रमाणेच आता तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिरातही पेड दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे भाविकांना 100 रुपयात वेगळ्या रांगेतून दर्शन घेता येणार आहे. तसेच अभिषेक शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दर्शन रांगेप्रमाणेच अभिषेकासाठीचे शुल्कही 10 रूपयांवरून 100 रूपये करण्यात आलं आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर शिर्डीतही व्हीआयपी दर्शन सुरु करण्यात आलं होतं. आता त्याचप्रमाणे तुळजापूरमध्येही पेड दर्शन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस तुळजापूरमध्ये भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा अशी चर्चा आहे. मात्र, या निर्णयाला आमदार मधुकरराव चव्हाण यांनी जोरदार विरोध केला आहे.