मुंबई : स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेला 36 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एका वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील दिग्गजांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आले. अशातच या व्याख्यानमालेला तीन तप पूर्ण होत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक व भारताचे भूषण डॉ. सौम्या स्वामीनाथन या व्याख्यानमालेमार्फत संवाद साधणार आहेत.
सध्या कोरोनाची स्थिती नेमकी कशी आहे? दुसरी लाट का व कशी येते? त्यावरील उपाय? कोविड 19 च्या प्रसाराविषयी आरंभीचे भाकीत आणि आताची स्थिती ह्यात फरक पडत गेला आहे? कोणाशीही संपर्क न येताही त्याची बाधा होऊ शकते का? प्रतिकारशक्तीने त्यावर मात करता येते का? कोरोना होऊन गेल्यावर कोणत्या रोगविकृती होऊ शकतात? लस आल्यावर कोरोना आटोक्यात येण्यास किती कालावधी लागेल? सामुदायिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी)कशी व कधी येईल? जागतिक आरोग्य संघटनेची कार्यपद्धती कशी असते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी डॉ. सौम्या स्वामीनाथन या व्याख्यानमालेमार्फत संवाद साधणार आहेत. तसेत त्यांच्यासोबतच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आरोग्यतज्ज्ञ डॉ. रंजनाकुमार या आपल्या मराठी मायबोलीतून थेट जिनेव्हा मधून (स्वित्झर्लंड) बातचीत करणार आहेत.
डॉ. सौम्या स्वामीनाथन आणि डॉ. रंजनाकुमार या दोघींचंही संशोधन, उपोषणातून क्षयरोग का होता? आणि झोपडपट्टी भागांतील गरिब मुलांना आरोग्याच्या कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं, यावर त्यांनी हयातभर संशोधन केलं आहे. त्यामुळे साथीच्या रोगांवरील विशेष संशोधनाला दाद देण्यासाठी 2015 साली डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेत डेप्युटी सायन्टिस्ट म्हणून पदाभार स्विकारला होता. आता त्या मुख्य वैज्ञानिक आहेत. तर डॉ. रंजनाकुमार या वॅक्सिन अलायन्स या लस निर्माण करणाऱ्या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ आहेत.
28 नोव्हेंबर 200 रोजी, दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी डॅा. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या फेसबुक पेजवर आपण ही व्याख्यानमाला लाईव्ह पाहू शकता. तसेच एबीपी माझाच्या अधिकृत फेसबुक पेजवरही या व्याख्यानमालेचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
डॉ. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला लाईव्ह पाहण्यासाठी खालील फेसबुक पेजला भेट द्या :
- डॉ. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला पेज लिंक : https://www.facebook.com/srtvl1
- एबीपी माझा फेसबुक पेज लिंक : https://www.facebook.com/abpmajha