Corona Variant Omicron : जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं आता देशातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे.  महाराष्ट्र आणि केरळात बुधवारी ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले प्रत्येकी 4-4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तामिळनाडूमध्येही ओमायक्रॉनची लागण झालेला प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. सध्या देशात ओमायक्रॉनचे 73 रुग्ण आहेत. तर यापैकी सर्वाधिक 32 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आढळून आलेल्या चार नव्या रुग्णांपैकी 2 रुग्ण उस्मानाबादमधील, 1 रुग्ण मुंबई आणि एक बुलढाण्यातील आहे. यापैकी तीन रुग्णांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. बाधितांमध्ये एक महिला आणि 16 ते 67 वर्षांच्या तीन पुरुषांचाही समावेश आहे. या सर्व रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळून आलेली नाहीत. दरम्यान, काल (बुधवार) राज्यात 925 नव्या दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोणत्या राज्यात किती रुग्ण? 

राज्य  ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या
महाराष्ट्र  34
राजस्थान  17
दिल्ली  06
गुजरात  04
कर्नाटक  03
तेलंगणा 02
केरळ 05
आंध्रप्रदेश 01
चंदिगढ 01
पश्चिम बंगाल 01
तामिळनाडू  01
एकूण ओमायक्रॉनचे रुग्ण 73

राज्यात आत्तापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद 

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आत्तापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या 32 ओमायक्रॉन बाधितांपैकी 25  रूग्णांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं या 25 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. ही काहीशी दिलाशाची बाब आहे. मात्र हा दिलासा कायम राहणार का हा प्रश्न आहे कारण ओमायक्रॉन व्हेरियंटवर आपल्या कोरोना लशी परिणाम कारक नसतील अशी भीती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी व्यक्त केलंय. सध्या देशात 53 कोरोना रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. आणि हा प्रसार आणखी वेग पकडण्याची भीती आहे.

राज्यात 929 रुग्णांना डिस्चार्ज 

कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (बुधवारी) 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 929  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 94  हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. राज्यात काल 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 868 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 71 , 82, 510 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

ओमायक्रॉनचा जगात धुमाकुळ 

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील वैज्ञानिक या व्हेरियंटबाबत अधिकाधिक माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिका आणि यूकेमधून आलेल्या डेटानुसार, हा व्हेरियंट लहान मुलांना आपल्या विळख्यात ओढतोय. ब्रिटिश एक्सपर्ट्सनुसार, येत्या काळात जगासाठी ओमायक्रॉन मोठं आव्हान होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह