Aaditya Thackeray : मुंबईचे महत्व कमी करुन सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण, 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं असे वक्तव्य राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांन केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे लक्ष्य आता दिल्लीकडे असल्याचे दिसत आहे. इतर पक्ष नाटकं करतात आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकली नाही आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
सुभाष देसाईंनी आम्हाला शासकीय मराठी भाषा सक्तीची केली आहे. ती समजायला जरा अवघड आहे. जीआर वाचायला घेतला तर समजत नाही. देसाई सरांना विनंती आहे की ती थोडी सोपी करुन द्यावी असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मरिन ड्राईव्हला आपण मराठी भाषा मंडळाची इमारत उभारत आहोत. मराठी बदलत आहे. मराठी भाषेचा अभ्यास करण्याकरता वाचनालय उभारत आहोत. गिरगांव चौपाटीच्या बाजुला मराठी आणि संस्कृतीचे कलादालन सुरु करत असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त चित्रीकरण मुंबईत होतील याकरता प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
मराठी भाषेच्या शाळा, मातृभषेतील शाळा कमी होतात की जास्त यावरुन वाद सुरु असतात. पालकांचा कल सेमी इंग्रजीकडे असतो. मुंबई महापालिकेच्या १ हजार २३२ शाळा आहेत. मात्र, कोणतंही बोर्ड असो 10 वी पर्यंत मराठी शिकवलंच जाईल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुंबईचे महत्व कमी करुन सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण, 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं हे पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेले वक्तव्य मोठे मानले जात आहे. कारण आगामी काळात शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. सध्या देशात सुरु असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्यये शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा या दोन राज्यात विधानसबा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे पुढच्या काळात शिवसेना इतरही राज्यात निवडणूक लढवून दिल्लीत आपलं स्थान अधिक बळकट करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बतम्या:
- Sanjay Raut : मराठीची आर्थिक कोंडी करायची अन् कार्यक्रम घेऊन ढोंग करायचे : संजय राऊतांचा भाजपवर आरोप
- Bajarang Sonwane : सांगा बजरंग बप्पाचे चुकले काय? बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवर सोनवणे समर्थक नाराज