सांगली : ‘२०१७ मध्येच मी मंत्री होणार, माझ्यावर शिवसेनेचा कोणताही दबाव नाही.’ असं वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.


‘गुजरातमध्ये काहीही झालं तरीही मी मंत्री होणार. भाजप जिंकल्यानंतर माझा शपथविधी होईल. हे मला मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरुन वाटतं.’ असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.

‘गुजरातची लढाई भाजपसाठी सोपी नाही’

‘गुजरातमध्ये भाजप विजयी होईल, पण ही लढाई भाजपसाठी सोपी नाही, पण भाजप नक्कीच जिंकेल असं मला वाटतं.’ असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

‘मी विधानपरिषद जिंकलो असतो’
‘मी विधानपरिषद जिंकलो असतो, पण येथील निवडणुकीचा काही परिणाम गुजरात निवडणुकीवर होऊ नये असं मुख्यमंत्र्यांना वाटत होतं त्यामुळे मला उमेदवारी देण्यात आली नाही. ती उमेदवारी प्रसाद लाड यांना मिळाली आणि ते निवडूनही आले.’ असंही नारायण राणे म्हणाले.

संबंधित बातम्या :
नारायण राणेंच्या पक्षाच्या झेंड्याचं अनावरण