Imtiyaz Jaleel On Maharashtra Political Crisis : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला असून, यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. तर एमआयएमचे खासदार यांनी देखील या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यात ईडीचं सरकार स्थापन झालेलं असून, आधी दोन सुपरवायझर होते, मात्र आता तीन झाले असल्याची खोचक टीका जलील यांनी केली आहे. 


आज महाराष्ट्रात ईडीचं सरकार स्थापन झालेलं आहे. त्यांच्याकडे आधी दोन सुपरवायझर होते, मात्र आता तीन झाले आहे. मोदींनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीबद्दल काय बोलले होते, हे जनता विसरलेली नाही. मात्र फडणवीस विसरले असतील. ज्यांच्यामुळे हे सगळ झालं त्यांनी राष्ट्रवादीबाबत काय बोलले, हे तुम्ही विसरले, पण जनता विसरली नसल्याचे म्हणत जलील यांनी फडणवीस यांचे भाषण ऐकवून दाखवली. 


तर सत्तेसाठी तुमची पार्टी कोणत्या पातळीवर जाऊ शकते. लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या विरोधात मत दिले होतं. आता तुम्ही मोदींचं गुणगान करत आहेत. मोदी यांनी चांगले काम केलं हे कळण्यासाठी अजित पवार यांना नऊ वर्षे लागले. जनतेला काही कळत नाही का? असा सवाल देखील जलील यांनी उपस्थित केला आहे. 


संपूर्ण महाराष्ट्रात फटाके फोडणार 


राज्याच्या राजकारणात काहीही राहिलेले नाही. मी ईडीला बोललो, आता मुश्रीफ यांची फाईल‌ बंद करणार आहे. अजित दादा तुम्ही राष्ट्रवादीला फोडले आहे. सत्तेसाठी तुम्ही गेले, पण अस कोणत्याही राज्यात घडत नाही. तुम्ही एमआयएमला बी टीम म्हणत होते, आता कोण गेले सत्तेत. तर आम्ही उद्या फटाके फोडणार असून, तुमंचे अभिनंदन करणार आहोत. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फटाके फोडणार असल्याचे जलील म्हणाले. तसेच मोदींनी आणि भाजपने सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या डोक्यावर बसवले आहे. त्यामुळे सर्वात मोठे भ्रष्टाचारी तुम्ही आहात, असेही जलील म्हणाले. 


'आगे आगे देखो होता है क्या'


दरम्यान याचवेळी पुढे बोलताना जलील म्हणाले की,  काही नवीन राजकीय समीकरणे तयार होतील. त्यात आमचा खूप मोठा सहभाग असणार आहे. दलित आणि मुस्लिम भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही. भाजपच्या विरोधात असल्यामुळे तुम्हाला मतदान केले होते.  मोदींनी केलेल्या आरोपाचा तुम्ही उत्तर द्याला ते घोटाळा तुम्ही केला की तुमच्या काकांनी केला आहे. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूका लवकर घेतल्या जाणार. तर एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाणार का? यावर बोलताना 'आगे आगे देखो होता है क्या,' असे जलील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


CM Eknath Shine on Ajit Pawar : अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...