Imtiyaz Jaleel : सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला खरा मात्र, त्यावर जोरदार टिका होताना दिसतेय. विविध राजकीय नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत. सरकारच्या निर्णयावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच इशारा दिला आहे. ज्या दुकानात, सुपरमार्केटमध्ये वाईनविक्री होणार ती दुकाने एमआयएमकडून फोडण्यात येणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध जलील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.


सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरुन जलील यांनी थेट ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. जलील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज केले आहे. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, ज्या दुकानात, सुपरमार्केटमध्ये वाईनविक्री होईल ती दुकाने फोडून टाकावीत. आम्ही वाईनला कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. दारुमुळे किती महिलांना त्रास सहन करावा लागत आहे, हे आपल्याला माहित नसेल. महिलांनी थेट जाऊन ती दुकाने फोडू टाकावीत असे जलील म्हणाले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाद्या दुकानाचे उद्घाटन करायला औरंगाबदमध्ये यावे. यावेळी मी स्वत: ते दुकान फोडून टाकणार असल्याचा इशाराच राज्य सरकार ला दिला आहे. त्यामुळे वाईन विक्रीच्या मुद्यावरुन राजकारण पेटण्याची शक्यता आहे.


राज्यभरातील सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. परंतू, सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध होत आहे. सरकारच्या या निर्णयावर सामाजिक आणि राजयकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय योग्य नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. किराणा दुकानातून वाईन विक्री केल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील असे काही जणांचे म्हणणे आहे. तर वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. यातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगली भाव मिळेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: