IJSO 2022: कोलंबियाच्या (Colombia) बोगोटा (Bogota) येथे 2 ते 12 डिसेंबरदरम्यान पार पडलेल्या 19व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये (19th International Junior Science Olympiad) भारतानं चमकदार कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत अरित्रा मल्होत्रा (दिल्ली), राजदीप मिश्रा (जामनगर), देवेश पंकज भैया (जळगाव), वासु विजय (कोटा), बनिब्रता माजी (हैदराबाद) आणि अवनिश बंसाल (देहरादून) यांनी सुवर्णपदक जिंकून कोलंबियात भारताचा तिरंगा फडकावला. दरम्यान, प्रा. चित्रा जोशी (निवृत्त,आर. रुईया ज्युनियर कॉलेज, मुंबई), डॉ. सुभोजित सेन (UM-DAE CEBS, मुंबई), श्री विशाल देव अशोक  (S.I.E.S. कॉलेज ऑफ विज्ञान आणि कला, मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली भारतानं सहा सुवर्णपदकांची कमाई केलीय. 

यंदाच्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये एकूण 35 देशातील 203 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महत्वाचं म्हणजे, ही स्पर्धा युक्रेनच्या कीवमध्ये होणार होती. परंतु, युक्रेनमधील युद्धामुळं ही स्पर्धा कोलंबियाच्या बोगोटा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.19व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड पदकतालिकेत भारतानं सहा सुवर्णपदक जिंकून अव्वल स्थान पटकावलं. हा सुवर्णपदकं जिंकणारा भारत एकमेव देश ठरला. या स्पर्धेत  एकूण 20 सुवर्ण, 42 रौप्य आणि 59 कांस्य पदके देण्यात आली.अरित्र, अवनीश आणि राजदीप या त्रिकुटानं प्रायोगिक स्पर्धेत दुसऱ्या संघासोबत संयुक्तपणे कांस्यपदक मिळवलंय. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व भारतीय विद्यार्थ्यांचं आणि उर्वरित भारतीय प्रतिनिधी मंडळावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.


भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेल्या विद्यार्थ्यांची नावं-

क्रमांक विद्यार्थ्यांचं नाव पदक
1  अरित्रा मल्होत्रा (दिल्ली) सुवर्णपदकं
2 राजदीप मिश्रा (जामनगर) सुवर्णपदकं
3 देवेश पंकज भैया (जळगाव) सुवर्णपदकं
4 वासु विजय (कोटा) सुवर्णपदकं
5 बनिब्रता माजी (हैदराबाद) सुवर्णपदकं
6 अवनिश बंसाल (देहरादून) सुवर्णपदकं

 

भारतीयांची दमदार कामगिरी
ही 2022 मधील अखेरची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा होती. यावर्षी गणित आणि विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ज्यात भारताला 12 सुवर्ण, 13 रौप्य आणि 5 कांस्यपदकं मिळाली. 

हे देखील वाचा-