Ideas of India 2023 : एबीपी नेटवर्कच्या वतीनं 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India 2023) या दोन दिवसीय कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे.  आजपासून (24 फेब्रुवारी) समिटला सुरुवात झाली. यूकेच्या (UK) माजी पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) आणि सीईओ अविनाश पांडे (CEO Avinash Pandey) यांनी दीप प्रज्वलन करुन 'आयडियाज ऑफ इंडिया'च्या समिटचे उद्घाटन केले. एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केलं. यावेळी अविनाश पांडे यांनी देश, जग, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसारख्या मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं.


आज आपण कुठे आणि उद्या कुठे असणार हे समजून घेण्यासाठी एकत्र


आज आपण कुठे आहोत आणि उद्या कुठे असणार हे समजून घेण्यासाठी आज आपपण सर्वजण एकत्र जमलो असल्याचे अविनाश पांडे म्हणाले. आम्ही या व्यासपीठावर जगातील आणि देशातील सर्वोत्तम विचार असलेल्या मान्यवरांना आणले आहे. मागील वर्षी जग कोरोना सारख्या संकटांचा सामना करत होते.  मागील वर्षी देखील आपण आयडियाज ऑफ इंडिया समिटचे आयोजन केलं होतं. गेल्या वर्षी या समिटमध्ये मास्क घालून सर्व मान्यवर सहभागी झाले होते असे अविनाश पांडे म्हणाले.


एबीपी नेटवर्कचा आयडियाज ऑफ इंडिया हा कार्यक्रम 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशातील आणि जगातील विविध राजकीय, सांस्कृतिक आणि कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्तींना एकाच मंचावर आमंत्रित करण्यात आलं आहे.