IAS Vaibhav Waghmare : धारणीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी (IAS) वैभव वाघमारे (Vaibhav Waghmare) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिली घटना आहे. वैभव वाघमारे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे राजीनामा पाठवला आहे. वैभव यांनी स्वत: पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहेत.

  


'काल देशाच्या सर्वोत्कृष्ट नोकरीचा (IAS) राजीनामा दिला.' असं वैभव यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, 'हे जीवनात काहितरी अजुन चांगले व उदात्त करण्याच्या शोधापोटी केले गेले. निर्णय घेणे थोडेसे कठीण होते. या धाडसामागे कारण आणि प्रेरणा असलेल्या तथागतांचे आभार. IAS, (IRS, आणि  IRAS) चे आभार, ज्याने  फक्त तीन वर्षांत जीवनाचा इतका समृद्ध अनुभव दिला,  जो अनुभव मिळण्यासाठी अन्यथा सामान्य आयुष्याचा साधारणपणे 20-30 वर्षांचा कालावधी लागला असता. अस म्हणलं जात की आयएएस ही देशातील सर्वोत्तम सरकारी नोकरी आहे. माझा तर विश्वास आहे की ही जगातील सर्वोत्तम सरकारी नोकरी आहे. पण जगात जे सर्वोत्कृष्ट समजले जाते ते एखाद्याला आवडलेच पाहिजे, व त्याने ते  आयुष्यभर केले पाहिजे हे आवश्यक आहे का?भारतीय प्रशासकीय सेवा, व सेवेत कार्यरत असलेले चांगले अधिकारी, ज्याना भेटण्याचा व  ज्यांचे सोबत काम करण्याचा योग आला त्याचे आभार. तथापि, मला आशा आहे की हा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारला जाईल आणि माझ्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीतून मला मुक्त केले जाईल.'



संबंधित बातम्या  :