IAS Officer Transfers In Maharashtra: गेल्या आठवड्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर (IAS Officer Transfers ) आता राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहे. छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) आयुक्त अभिजीत चौधरी (Abhijeet Chaudhary) यांच्यासह राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जीएसटी (GST) कार्यालयात कार्यरत असलेले जीएसटी सहआयुक्त जी श्रीकांत (G Srikanth) यांची संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली झाली आहे. सोबतच राज्यातील इतर नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आले आहे.


गेल्या आठवड्यात सरकारने राज्यातील 30 पेक्षा अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश निघाला आहे. ज्यात राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. विशेष म्हणजे धडाकेबाज अधिकारी समजल्या जाणाऱ्या तुकाराम मुंडे यांची देखील मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.        


'या' अधिकाऱ्यांच्या बदल्या...  



  • 1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. नितीन करीर हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

  • 1992 च्या बॅचचे अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 1994 च्या बॅचचे अधिकारी डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

  • 1995 च्या अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी) यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

  • तुकाराम मुंढे, कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

  • 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून जबाबदारी आहे.

  • छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे.