नाशिक:  नाशिकच्या इगतपुरीमधल्या मिस्टीक व्हॅलीमधल्या पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी उच्चपदस्थ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुलांना अटक केल्यामुळं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील मुलांची कशी तारांबळ उडाली हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय.

13 मुलांसह 10 बारबालांवरही कारवाई करण्यात आला आहे.

कारवाई झालेल्यांमध्ये औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी, नंदूरबारचे सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूरचे पोलीस उपायुक्त यांच्या मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

या सर्व आरोपींनी या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग केलं होतं.

काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये इगतपुरीतल्या मिस्टी व्हॅलीत उच्चभ्रू परिवारातील मुलांचा धिंगाणा समोर आला आहे. याप्रकरणी 10 बार गर्लसह अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे.

ड्रग, अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना तातडीने जामीनही देण्यात आला. रविवारी मध्यरात्रीची ही घटना आहे.

पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार येथील  उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



संबंधित बातम्या
IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच', नाशिकमध्ये 13 जणांना अटक