लवकरच मंत्रिमंडळात असेन, नारायण राणेंचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 05 Jan 2018 05:29 PM (IST)
1 फेब्रुवारीपासून स्वाभिमान पक्षाची नोंदणी सुरु होणार असल्याचंही राणेंनी जाहीर केलं.
सिंधुदुर्ग : नवा पक्षा स्थापन केलेल्या नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि लोकसभेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी ही घोषणा केली. 1 फेब्रुवारीपासून स्वाभिमान पक्षाची नोंदणी सुरु होणार असल्याचंही राणेंनी जाहीर केलं. दरम्यान लांबलेल्या मंत्रिपदावर बोलताना राणे यांनी आपण लवकरच मंत्रिमंडळात असू, असा दावाही केला. दीर्घ काळ वाट पाहण्याची आपल्याला सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात असू, असं राणे म्हणाले. कोकणात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प जर पर्यावरणाला घातक ठरणारा असेल, तर तो प्रकल्प होऊ देणार नाही, अशीही भूमिका राणेंनी घेतली.